शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसदादा घेतील आता आस्थेने दखल !

By admin | Updated: July 12, 2014 23:48 IST

पोलीस अधीक्षकांचा नवा फंडा : प्रत्येक पोलीस ठाण्यात मोबाइल नंबरसह झळकल्या पाट्या

दत्ता यादव ल्ल सातारापोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अथवा चौकशीसाठी येणाऱ्या व्यक्तीला अनेकवेळा वागणूक व्यवस्थित मिळत नसते. परिणामी पोलिसांविषयी गैरसमज वाढत जातात. बऱ्याचदा तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जाते. त्यावेळी नेमके कोणाशी बोलावे, तक्रारदाराला सुचत नाही. तसचे बहुतांशवेळा पोलिसांकडून उद्धट वर्तन होत असल्यामुळे याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी एक नवा फंडा अंमलात आणला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात वरिष्ठांच्या मोबाईल नंबरसह पाट्या झळकल्या आहेत. त्यामुळे साहजिकच आता पोलीसदादा आस्थेने दखल घेतील.पोलीस ठाण्यात येणाऱ्या व्यक्तीला चांगली वागणूक दिली जात नाही, हा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव असेल. तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला गुन्हेगार समजून अरेरावीची भाषा वापरली जाते. त्यामुळे त्या व्यक्तीवर अन्याय होत असतो. परिणामी तो तक्रार न देताच घरचा रस्ता धरतो. यापूर्वी पोलीस ठाण्यात केवळ तक्रार न घेतल्यामुळे पोलिसांवरही खोटे आरोप झालेले आहेत. त्यामुळे विनाकारण पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर जात होती. एखादा नवखा माणूस पोलीस ठाण्यात गेलाच तर तो कावऱ्या बावऱ्या होतो. कोठे चौकशी करायची, कोणाला काय विचारायचे, हे समजत नसते. तेथे असलेल्या पोलिसांकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही तर कोणाला भेटायचे, असा मोठा प्रश्न उपस्थित होत असतो. अधिकारी व पोलिसांच्या खिशावर केवळ त्यांची नावे लिहिलेली असतात; परंतु समजा कोणी तक्रार अथवा म्हणणे ऐकून घेतलेच नाही तर कोणाकडे तक्रार करायची, असा प्रश्न तक्रारदारासमोर निर्माण होत असतो. या समस्यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस डॉ. अधीक्षक अभिनव देशमुख यांनी वेगळाच फंडा अंमलात आणला आहे. पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदाराशेजारी एक पाटी लावली आहे. आपली तक्रार नोंदवून न घेतल्यास किंवा कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने तुमचे म्हणणे ऐकून न घेतल्यास, टाळाटाळ केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबरवर तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन त्या पाटीवर करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे आणि अन्य एका अधिकाऱ्याचा नंबर त्या पाटीवर देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर पोलीस ठाण्यात ही ‘आस्थेची’ पाटी झळकत आहे. पोलीस ठाण्यात येणारे नागरिक ही पाटी वाचून समाधान व्यक्त करत आहेत. या सूचना फलकामुळे तरी पोलीस नक्कीच आस्थेने तक्रारदाराशी वागतील आणि नागरिकांचाही पोलिसांविषयी असलेला गैरसमज दूर होईल.