शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

मुळीकवाडीच्या माळावर फुलल्या डाळिंब बागा

By admin | Updated: November 23, 2015 00:25 IST

‘जलसंवर्धना’ने नांदलमध्ये जलक्रांती : विहिरींची पाणीपातळी वाढली

फलटण : येथील औद्योगिक वसाहतीमधील कमिन्स मेगासाईट प्रकल्पाने सामाजिक बांधिलकीतून परिसरातील गावांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राबविलेल्या जलसंवर्धन प्रकल्पाचे हळूहळू सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून, नांदल व मुळीकवाडीच्या माळावर डाळिंबाच्या बागा फुलू लागल्या आहेत. या परिसरात बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे.फलटण औद्योगिक वसाहतीत कमिन्स मेगासाईटचे काम सुरू झाल्यापासून विविध सामाजिक उपक्रमांचा एक भाग म्हणून परिसरातील गावात जाणवत असलेल्या पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले. त्यात सिमेंट बंधारा बांधणे, उपलब्ध पाणीसाठ्यातील गाळ काढणे, ठिबक सिंचनपद्धती राबविणे व महत्त्वाचा भाग म्हणून जलसंवर्धनाविषयी लोकशिक्षण व जनजागृती करणे आदी बाबी आग्रहपूर्वक केल्यामुळे सद्य:स्थितीत टाकुबाईचीवाडी, नांदल, मुळीकवाडी, ढवळेवाडी परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढल्याचे दृष्य परिणाम दिसू लागले आहेत.गेल्या पाच दशकांपासून नांदल गावाने पाण्याची कमतरता अनुभवली. मात्र, २०१२ पासून ‘कमिन्स’ने राबविलेल्या जलसंवर्धनाच्या प्रकल्पातून भूजल पातळी वाढली आहे. परिणामी शेती व पिण्यासाठी वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाल्याचे गावचे माजी सरपंच अनिल कोळेकर यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर सध्या आम्ही उपलब्ध पाण्यावर कांदा, सोयाबीन, बाजरीची पिके चांगल्या प्रमाणात घेत आहोत. परिणामी लोणंद बाजारपेठेत कांदा विक्रीला पाठविणाऱ्या गावात आमच्या गावाचीही गणना होऊ लागली आहे. त्यांनी स्पष्ट केले. ‘कमिन्स’नजीक मुळीकवाडी गावात जलसंवर्धनाबाबत केलेल्या जनजागृतीमुळे समृद्धी आली आहे.पूर्वी जेमतेम पावसाळ्यानंतर दोन महिने पाणी टिकत होते ते आता वर्षभर टिकून राहिल्याने शेतीचे उत्पादन चांगलेच वाढले असल्याचे तेथील शेतकरी दत्ता बांदलकर यांनी सांगितले. तालुक्याच्या दक्षिण भागातील टाकुबाईचीवाडी गावाला उन्हाळ्यात नेहमी पाण्याची कमतरता भासत होती. ‘कमिन्स’ने परिसरातील दोन तलावांतील गाळ काढल्याने पडलेल्या पावसाचे पाणी अडवले गेल्यामुळे टाकुबाईचीवाडी गावच्या परिसरातील विहिरी हाताने पाणी काढण्याइतक्या काठोकाठ भरल्या असल्याचे चित्र आहे. किंबहुना या गावातील शेतकऱ्यांकडे सध्या शेतीची औजारे मोकळेपणाने खरेदी करण्याची क्षमता आली आहे. (प्रतिनिधी)तब्बल ९६०५ तास समाजोपयोगी खर्च‘कमिन्स’मधील कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेतील ९६०५ तास आतापर्यंत अशा प्रकारच्या कार्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत विविध प्रकारच्या समाजोपयोगी कामासाठी खर्च केल्याचे संबंधित यंत्रणेने सांगितले.