Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:44 IST2025-10-28T16:42:09+5:302025-10-28T16:44:47+5:30
Phaltan Doctor News: फलटणमधील डॉक्टर तरुणीचा मृत्यू कशामुळे झाला, याबद्दलचा पोस्टमार्टेम रिपोर्ट अखेर मिळाला आहे.

Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
Phaltan Doctor Case in Marathi: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. हातावर सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली होती. पण, तिची हत्या करण्यात आली असावी, अशा शंकाही उपस्थित केल्या गेल्या. दरम्यान डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून, गळफासामुळे मृत्यू झाल्याचे त्यात म्हटले आहे.
डॉक्टर तरुणीच्या मृत्यूने सातारा जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पोलीस आणि माजी खासदाराचे नाव या प्रकरणात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले. डॉक्टर तरुणीच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे दावे होत असतानाच पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिचा मृत्यू गळफासामुळे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
डॉक्टर तरुणीच्या शरीरावर इतर कुठल्याही जखमा आढळल्या नाहीत. तरुणीने गळफास घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाला, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
गोपाळ बदनेने मोबाईल लपवला
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने याला अटक झालेली आहे. त्याला पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. डॉक्टर तरुणी आणि गोपाळ बदने यांच्यात संभाषण झाल्याची माहिती महिला आयोगाकडून देण्यात आली. आता समोर आलेल्या माहितीनुसार, गोपाळ बदनने फरार होता. त्या काळात त्याने त्याचा मोबाईल लवपून ठेवला. त्याचा मोबाईल अजूनही पोलिसांना सापडलेला नाही.