शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंदांच्या चित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन

By admin | Updated: September 15, 2014 00:13 IST

स्वामी विवेकानंद यांची चित्र कायमस्वरुपी प्रदर्शनात ठेवण्यासाठी एक हॉल व रामकृष्ण परमहंस यांचा मठ उभारण्याचा संकल्प ओतारी कुटुंबीयांनी केला आहे

चिपळूण : शहरालगत असलेल्या वालोपे गावी रेल्वे स्टेशनसमोर १३ गुंठे जागेत स्वामी विवेकानंद यांची चित्र कायमस्वरुपी प्रदर्शनात ठेवण्यासाठी एक हॉल व रामकृष्ण परमहंस यांचा मठ उभारण्याचा संकल्प ओतारी कुटुंबीयांनी केला आहे. कोणत्याही प्रकारचे शास्त्रोक्त कला शिक्षण न घेता केवळ वारसा हक्काने चालत आलेल्या कलेच्या साथीला जिद्द, परिश्रम, सातत्य आणि स्वामी विवेकानंदांवर असलेली निस्सिम भक्ती, श्रद्धा गेली अनेक वर्षे हेमलता ओतारी तथा ओतारीआई यांची अव्याहतपणे सुरु आहे. त्यांची योग अभ्यासक आणि प्रशिक्षक अविनाश देवनाळकर यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्यामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या कलाकाराला जागे केले. त्यांच्या जीवनातील हा टर्निंग पॉर्ईंट महत्त्वाचा होता. देवनाळकर हे स्वामी विवेकानंदांचे निस्सिम शिष्य. त्यांनी ओतारी आर्इंना स्वामींचा एक फोटो दिला आणि रंग व कुंचला घेऊन विवेकानंद साकारा, असा सल्ला नोंव्हेंबर २००० मध्ये दिला. गुरुंचा आदेश मानून त्यांनी स्वामींचे चित्र साकारले. त्यानंतर आतापर्यंत स्वामींच्या व गुरु रामकृष्ण परमहंसांच्या विविध भावमुद्रा चित्र स्वरुपात त्या सातत्याने साकारत राहिल्या. वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ओतारीआई यांनी साकारलेल्या या कलाकृती त्यांच्यासह इतरांनाही आनंद देत आहेत. एक वेगळ्या प्रकारची अनुभूती त्यातून मिळत आहे. यातच त्यांच्या चित्रकलेतील यशाचे रहस्य आहे. चित्र कायमस्वरुपी प्रदर्शनात ठेवण्यासाठी वालोपे येथे एक हॉल व रामकृष्ण परमहंस यांचा मठ ओतारी कुटुंबीय उभारणार आहेत. यातून विवेकानंदांचे जीवनदर्शन कलारसिकांना होणार आहे. (प्रतिनिधी)