पाटीलवाडीत अज्ञाताने गवताच्या गंजी पेटवल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 18:00 IST2021-06-11T17:58:56+5:302021-06-11T18:00:17+5:30
Fire Satara : पाटीलवाडी (म्हासोली, ता. कऱ्हाड) येथील तीन शेतकऱ्यांची अज्ञात व्यक्तीने गवत आणि पिंजराच्या गंजी पेटवून दिल्याने पंधरा हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

पाटीलवाडीत अज्ञाताने गवताच्या गंजी पेटवल्या
कऱ्हाड : पाटीलवाडी (म्हासोली, ता. कऱ्हाड) येथील तीन शेतकऱ्यांची अज्ञात व्यक्तीने गवत आणि पिंजराच्या गंजी पेटवून दिल्याने पंधरा हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
पाटीलवाडी येथील सुमन शंकर पाटील, सुनंदा अंकुश पाटील, शोभा सदाशिव पाटील या निराधार महिलांच्या वाडीच्या लगत असणाऱ्या मोकळ्या जागेत जनावरांच्यासाठी गवत, पिंजर यांच्या तीन-तीन गंजी रचून ठेवल्या होत्या.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या सर्व पेटवून दिल्याने यात पंधरा हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. जमवून ठेवलेल्या गंजी पेटवून दिल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित व्यक्तीची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.