पाटणचे जलसंपदा प्रकल्प निधीअभावी रखडले-प्रकल्पग्रस्तांच्या शेतीलाही पाणी मिळेना :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:27 PM2018-12-19T22:27:15+5:302018-12-19T22:28:12+5:30

पाटण : पाण्याशिवाय तालुक्यातील डोंगरदऱ्यांतील शेतकºयांची प्रगती नाही. जिल्ह्यामध्ये शासनाच्या जलसंपदा विभागाने २००० मध्ये काही प्रकल्प हाती घेतले. त्यामुळे ...

 Patan's water resources project has failed due to lack of funds: Farmers also get water from the project: | पाटणचे जलसंपदा प्रकल्प निधीअभावी रखडले-प्रकल्पग्रस्तांच्या शेतीलाही पाणी मिळेना :

पाटणचे जलसंपदा प्रकल्प निधीअभावी रखडले-प्रकल्पग्रस्तांच्या शेतीलाही पाणी मिळेना :

Next
ठळक मुद्देमोरगिरी, साखरी, निवकणे, बिबी प्रकल्प ठप्प, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू

पाटण : पाण्याशिवाय तालुक्यातील डोंगरदऱ्यांतील शेतकºयांची प्रगती नाही. जिल्ह्यामध्ये शासनाच्या जलसंपदा विभागाने २००० मध्ये काही प्रकल्प हाती घेतले. त्यामुळे तालुक्यातील हजारो कोटी खर्च करून उभे राहिलेले प्रकल्प आता काही कोटींच्या निधीसाठी अपूर्णावस्थेत आहेत.

पाटण तालुक्यातील मोरगिरी, साखरी चिटेघर, निवकणे आणि बिबी येथील सलतेवाडीजवळ असणारा लहान प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे. तालुक्यातील हे प्रकल्प लवकर मंजुरी मिळवून ते लवकर पूर्ण होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते. हे प्रकल्प पूर्ण होऊन स्थानिकांच्या शेतीला पाणी आणि त्याबरोबर भौगोलिक परिस्थितीचा फायदा व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत होते. या प्रकल्पांमुळे पर्यटन, मत्स्यशेतीलाही फायदा झाला असता. पूरक व्यवसाय उभे राहून भूमिपुत्रांच्या हाताला काम मिळाले असते.

पाटण तालुक्याचा भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी सर्वात जास्त लहान-मोठे प्रकल्प हे एकट्या पाटण तालुक्यात आले. सुरुवातीला या प्रकल्पाकरिता शासनाने निधीही दिला. मात्र त्यानंतर या प्रकल्पांकडे दुर्लक्ष करण्यात आले. मोरणा गुरेघर प्रकल्पाचे पाणी हे डाव्या तीरावरून सोळा किलोमीटर आणि उजव्या तीरावरून ३२ किलोमीटरचे कालवे काढून शेतीसाठी पुरविण्यात येणार होते. मात्र, सध्या या प्रकल्पात पाणीसाठा असूनही सर्वसामान्य शेतकºयांपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. दोन्ही बाजूने कालव्याचे काम करण्यासाठी निधीचा तुडवडा आहे. त्यामुळे कालव्याची कामे रखडली आहेत. तर काही ठिकाणी राजकारण करण्यात आले आहे. त्यामुळे या विभागातील शेतकºयांना कर्ज काढून मोरणा नदीमधून पाणी उचलून शेतीला घ्यावे लागले. कालव्यातून पाणी मिळाले असते तर मोरणा विभाग सधन आणि संपन्न दिसला असता.

बिबी गावाजवळच सलतेवाडी येथील येडोबा नाल्यावर संपूर्ण मातीच्या बंधाºयाचे काम सुमारे ८० टक्के पूर्ण असून, राहिलेल्या कामाचे माती परीक्षण करण्यासाठी पाच वर्षे झाली तरी अद्याप संबंधित विभागाकडून कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ८० टक्के काम होऊनही पाणीसाठा पूर्ण क्षमतेने झाला नाही. फक्त जमिनी देऊन अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पाकडे निव्वळ पाहत बसण्याची वेळ तालुक्यातील जनतेवर आली आहे.

निवकणे प्रकल्पाकरिता जनतेला जवळपास पंधरा वर्षे जमिनी देऊनही शेतीला पाणी मिळाले नाही. दरवर्षी या प्रकल्पाच्या कामाकडे शेतकरी डोळे लावून बसलेले असतात. यावर्षी तरी अपूर्ण प्रकल्पाला निधी मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. मात्र, शासनांची घोर निराशा करत आहे.


निवकणे प्रकल्पाकरिता जनतेला जवळपास पंधरा वर्षे जमिनी देऊनही शेतीला पाणी मिळाले नाही. दरवर्षी या प्रकल्पाच्या कामाकडे शेतकरी डोळे लावून बसलेले असतात. यावर्षी तरी अपूर्ण प्रकल्पाला निधी मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना असते. मात्र, शासनांची घोर निराशा करत आहे.

 

 

Web Title:  Patan's water resources project has failed due to lack of funds: Farmers also get water from the project:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.