येरफळे सोसायटीवर पाटणकर गटाची सत्ता अबाधित!

By Admin | Updated: May 25, 2016 23:24 IST2016-05-25T21:41:37+5:302016-05-25T23:24:30+5:30

सोसायटी पंचवार्षिक निवडणूक : देसाई गटाला एका जागेवर समाधान

Patankar group's power over Yerafale society prevailed! | येरफळे सोसायटीवर पाटणकर गटाची सत्ता अबाधित!

येरफळे सोसायटीवर पाटणकर गटाची सत्ता अबाधित!

पाटण : पाटण तालुक्यातील येरफळे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाची सत्ता अबाधित राहिली आहे. विरोधी आमदार शंभूराज देसाई गटाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले.
येरफळे सोसायटीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर तेरा जागांपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. यामध्ये महिला राखीवमधून उषाताई पाटील, सावित्री जाधव. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून शंकर भिसे, विशेष मागास प्रवर्गातून बबनराव कोळी हे पाटणकर गटाचे चार उमेदवार तर देसाई गटाचे इतर मागास प्रवर्गातील शंकर पाटील हे बिनविरोध निवडून आले होते.
उर्वरित सर्वसाधारण मतदार संघातील आठ जागांसाठी रविवारी निवडणूक झाली. यामध्ये माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाचे वर्चस्व मानणाऱ्या राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने विजयश्री खेचून आणली. यामध्ये आत्माराम लुगडे, लक्ष्मण लुगडे, तुकाराम लुगडे, नवनाथ पडवळ, शंकर पडवळ, सोपान पडवळ, उत्तम साळुंखे, तानाजी लुगडे विजयी झाले. विजयी उमेदवारांचा विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, राजाभाऊ काळे यांनी गौरव केला. (वार्ताहर)

Web Title: Patankar group's power over Yerafale society prevailed!