शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

टँकरमुळे फरशी फुटल्याने तलवार काढून माजवली दहशत, साताऱ्यातील सहा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 13:39 IST

संशयितांनी काही जणांना मारहाण करत तलवार काढून दहशत निर्माण केली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकीही दिली.

सातारा : सातारा शहराजवळील सैदापूर येथे पाण्याच्या टँकरमुळे फरशी फुटली. यामुळे संतप्त संशयितांनी काहींना मारहाण करत तलावर काढून दहशत माजवली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात संशयित सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी साईल सुनील गवरे (वय १९, रा. स्वामी विवेकानंद नगर, सैदापूर, ता. सातारा) याने तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार तुषार सोमनाथ केदार आणि सोमनाथ केदार (दोघेही रा. स्वामी विवेकानंद नगर) यांच्यासह इतर चार साथीदारांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.सैदापूर येथे बुधवारी (दि.२०) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. पाणी टँकरमुळे फरशी तुटली. त्यामुळे संशयितांनी काही जणांना  मारहाण करत तलवार काढून दहशत निर्माण केली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकीही दिली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  याबाबत तक्रार दिल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार माने हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी