शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

२४० झाडे तोडणाऱ्यांवर ‘ब्रह्मा’स्त्र

By admin | Updated: July 16, 2014 01:22 IST

महाबळेश्वरात गुन्हा : उद्योगपतीविरुद्ध कारवाईची पहिलीच वेळ

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरालगत असणाऱ्या तारांकित हॉटेलच्या मालकाविरुद्ध वृक्षतोडप्रकरणी पालिकेने गुन्हा नोंद केला आहे. ‘ब्रह्मा कॉर्प हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स असे या हॉटेलचे नाव असून, पालिकेकडून उद्योगपतीविरुद्ध गुन्हा दाखल केला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.महाबळेश्वर नगरपालिकेने वनअधिकारी कल्याण बाजीराव हिरवे (वय ४०) यांना यासंदर्भात फिर्याद दिली आहे. याबाबत महाबळेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी : महाबळेश्वर नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व्हे नंबर २११, २१२ मधील दहा हेक्टर व ५८.२ आर क्षेत्रात ब्रह्मा कॉर्प हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स लि. या कंपनीचे मालक रामकुमार बी आगरवाल, रा. पुणे यांनी आणि त्यांचे व्यवस्थापक अक्का मंदार रेगे (रा. औंध-पुणे) यांनी संगनमत करून त्यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत २४५ झाडे तोडल्याची फिर्याद दाखल झाली आहे. या परिसरात दुमजली बंगले, गटारे, मैला टाक्या, पाण्याचे हौद, बगीचा बनविण्यासाठी या झाडांचा ‘अडथळा’ झाला होता. यामध्ये जांभळाची १२५ झाडे, तर गेळा ३०, हिरडा १५, पिसा १३, मेडसिंग ८, अंजन ४७, भोमा २, ऐन १, नरक्या तीन व चिमट १ अशा झाडांचा समावेश आहे. यातील काही औषधी वनस्पती आहेत. झाडे व झाडाच्या फांद्या तोडून २ लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान संबंधितांनी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.महाबळेश्वरमधील आजपर्यंतचे सर्वांत मोठे हॉटेल उभारण्यासाठी ही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आल्याचे समोर आले असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिक वृक्षप्रेमींनी केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. काशिद, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)