शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ओढ्यावरील बांधकामांना स्थगितीचे आदेश

By admin | Updated: April 15, 2015 00:18 IST

विजय शिवतारे : ओढ्याशेजारील बांधकामांची मोजमापे घेऊन ‘ओढा पड’ जमिनी ताब्यात घेण्याच्या सूचना

सातारा : शहरात ऐतिहासिक ओढ्यांवर सुरु असलेल्या बांधकामांना नोटिसा देऊन बांधकामांना स्थगिती देण्याचे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हा प्रशासनाला मंगळवारी दिले. ओढ्यालगत असणाऱ्या मिळकतींची मोजमापे घेऊन ‘ओढा पड’ जमिनी ताब्यात घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केल्या. साताऱ्यातील ऐतिहासिक सुळाचा ओढा मुजवून त्यावर बांधकाम केले गेल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासना नंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी आपचे जिल्हा संयोजक सागर भोगावकर यांनी शिष्टमंडळासोबत पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना ओढ्यावरील अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश देण्याची मागणी केली. दरम्यान, यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना पालकमंत्र्यांनी हे आदेश दिले. सातारा शहरात अजिंक्यतारा किल्ल्यावरुन वाहत येणारे अनेक ऐतिहासिक ओढे आहेत. मात्र, या ओढ्यांचे प्रवाह बदलून बांधकामे करण्यात आली आहेत. काहींनी तर हे ओढे मुजवून त्यावर बांधकामे केली आहेत. या ओढ्यांच्या शासकीय जमिनी अनेकांनी लाटल्याचे चित्र सार्वत्रिक आहे. ओढे मुजवून त्यावर बांधकाम करणाऱ्यांवर कारवाईच होत नसल्याने अशी बांधकामे फोफावत चालली आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील ओढ्यालगतच्या मिळकतींची मोजणी करुन ज्यांनी अतिक्रमणे केली आहेत, त्यांना ती काढून टाकण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने कराव्यात. तसेच शासनाच्या मालकीची ओढा पड जमीन ताब्यात घेण्यात याव्यात, असे आदेश पालकमंत्र्यांनी काढले आहेत. (प्रतिनिधी)