शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

संरक्षित पाणीसाठ्याने बहरल्या फळबागा ! सातारा जिल्ह्यात १३०७ शेततळी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 11:08 PM

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जलक्रांती होत असतानाच राज्य शासनाची मागेल त्याला शेततळे ही योजनाही महत्त्वपूर्ण ठरू लागली आहे. कारण या शेततळ्यामुळे संरक्षित पाणी उपलब्ध होत असल्याने टंचाईतही फळबागा घेणे फायदेशीर ठरले आहे.

ठळक मुद्दे५ कोटी ३६ लाखांचे अनुदान वाटप

नितीन काळेल ।सातारा : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जलक्रांती होत असतानाच राज्य शासनाची मागेल त्याला शेततळे ही योजनाही महत्त्वपूर्ण ठरू लागली आहे. कारण या शेततळ्यामुळे संरक्षित पाणी उपलब्ध होत असल्याने टंचाईतही फळबागा घेणे फायदेशीर ठरले आहे. तर या योजनेंतर्गंत जिल्ह्यात आतापर्यंत १३०७ शेततळी पूर्ण झाली असून, संबंधित शेतकºयांना ५ कोटी ३६ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. मार्च २०१९ अखेरपर्यंत २ हजार शेततळ्यांचे जिल्ह्याला उद्दिष्ट आहे.

शेती हाच जिल्ह्याचा केंद्रबिंदू ठरला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात समृद्धी असली तरी पूर्वेकडील माण, खटाव, कोरेगाव, फलटण आदी तालुक्यांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. तसेच वारंवारच्या दुष्काळाने चारा आणि पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. माण, खटाव तालुक्यांत तर अद्यापही हजारो हेक्टर शेती पाण्याविना पडून आहे.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत कमी-अधिक फरकाने अशीच परिसिथती असल्याने पावसाचा आधारच अशावेळी महत्त्वपूर्ण ठरतो. त्यातच अलीकडील काळात दुष्काळी तालुक्यातील चित्र पालटू लागले आहे. याला कारण, जलसंधारण व वॉटर कपच्या माध्यमातून झालेले काम. तसेच राज्य शासनाच्या मागेल त्याला शेततळे यामधूनही शास्वत पाणी उपलब्ध होत आहे. हे पाणी फळबागांसाठी उपयुक्त ठरत आहे; पण यासाठी पाऊस आवश्यक असून, या तळ्यातील पाणी टंचाई व उन्हाळ्यात गरजेनुसार वापरात येते.

राज्यात २०१६ पासून मागेल त्याला शेततळे, ही योजना सुरू झाली आहे. मार्च २०१९ अखेर जिल्ह्यात २ हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३०७ शेततळी पूर्ण झाली आहेत. तर ५२ शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. शासनाकडून १३०७ शेतकºयांना अनुदानापोटी ५ कोटी ३६ लाख १५ हजार ४३७ रुपये देण्यात आले आहेत. तर या योजनेसाठी तब्बल ५०६३ अर्ज आॅनलाईन आले होते. या शेततळ्याला आकारानुसार २६ हजारांपासून ५० हजारांपर्यंत अनुदान मिळते. शेतकºयाच्या नावावर किमान ६० गुंठे जमीन असणे आवश्यक आहे. मात्र, जादा खर्च शेतकºयांना करावा लागतो.

दुष्काळी तालुक्यात अधिक फायदा...या शेततळ्यांचा फायदा विशेषत: करून माण, खटाव, फलटणसारख्या दुष्काळी तालुक्यांत अधिक करून होताना दिसतो. पावसाळ्यात शेततळ्यात पाणी साठते. हे पाणी टंचाईच्या काळात वापरात येते. फळबागांना हे पाणी फायदेशीर ठरते. कारण ठिबकवर असणाऱ्या बागांना हे पाणी पुरवून वापरता येते. त्यामुळे अनेक शेतकºयांनी या शेततळ्यावरच उन्हाळ्यातही फळबागा जोपासल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण अर्थकारणच बदलून गेले आहे. 

शेततळी पूर्ण आकडेवारी तालुकानिहायमाण- ३००, फलटण- २६९, खटाव- २२८, कोरेगाव- १७८, खंडाळा- ८१, वाई- ७४, सातारा- ७२, कºहाड-७३, जावळी- १७, पाटण- १२ आणि महाबळेश्वर- ३.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSatara areaसातारा परिसर