शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात खुलेआम ‘खुला बार’

By admin | Updated: August 22, 2015 00:54 IST

ऐतिहासिक ठिकाणंही तळीरामांच्या कचाट्यात : दारू पिण्यासाठी वडापाव अन् आम्लेटच्या गाड्यांचा बिनधास्त वापर; रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांना प्रचंड त्रास

जगदीश कोष्टी ल्ल सातारा सावित्रीच्या लेकींच्या पुढाकारामुळे गावागावांतील बाटली आडवी झाली, त्यामुळे एकेकाळी जिल्ह्याचा राज्यात गवगवा होता; पण आता काळ बदलला आहे. सातारा शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर खुला बार पाहायला मिळत आहेत. खिशातून बाटल्या आणायच्या अन् वडापाव, आम्लेटच्या गाड्यांवर जाऊन दारू ढोसायची, हाच धंदा सुरू झाला आहे. राजवाडा चौपाटी परिसर, जुना मोटार स्टॅण्ड, खालचा रस्ता, राधिका रस्ता, बसस्थानक तसेच पोवई नाका परिसरातील गाडे यासाठीच प्रसिद्ध आहेत. बहुसंख्य गाडे दारू दुकानाच्या परिसरात आहेत. त्यामुळे त्यांना चांगलीच चलती आहे. त्यातील मोजक्या गाड्यांवर चोरून दारू विकली जात असली तरी खिशातून बाटली आणून पिणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. राजवाडा परिसरातील तांदूळआळीत दारूची अनेक दुकाने आहेत. तेथून खरेदी करून जवळच असलेल्या नगरपालिकेच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत बसून तळीरामांची मैफल जमत असते. या ठिकाणी फेरफटका मारला असता, ग्लास व बाटल्यांची झाकणं पडलेली पाहायला मिळतात. या ठिकाणी कोणीही पहारेकरी नसल्याने तळीरामांकडे दारूसाठी पैसे नसतील, तर या इमारतीचेच गज काढून ते भंगारात विकतात. त्याच पैशातून मद्य आणून पित असतात, असा आरोप स्थानिकांमधून केला जात आहे. एकेकाळी जिल्ह्यातील गावचे गावे दारूबंदीच्या मोहिमेत सहभागी होत होते. गावातून बिअर बारबरोबरच दारूही हद्दपार केली जात होती.