ट्रायल घेतो सांगून बुलेट घेऊन झाला पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 16:11 IST2022-03-09T16:11:20+5:302022-03-09T16:11:52+5:30

बुलेट ट्रायलसाठी घेऊन गेल्यानंतर अर्धा तास होऊन गेल्यानंतरही संबंधित व्यक्ती न आल्याने शेख यांनी शोधाशोध केली.

One man fled with a bullet, saying he would take the trial in satara | ट्रायल घेतो सांगून बुलेट घेऊन झाला पसार

ट्रायल घेतो सांगून बुलेट घेऊन झाला पसार

सातारा : बुलेटची ट्रायल घेतो असे सांगून एकाने बुलेट घेऊन पलायन केल्याची घटना साताऱ्यात घडली असून, याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनोळखीवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरीफ शेख यांचा यांचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. बुलेट विकायची असल्याचे त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. पुण्यातून बोलत असल्याचे सांगून एकाने शेख यांच्याशी व्हॉट्सॲपवर चॅट करुन संपर्क साधला. किमतीबाबत विचारणा झाल्यानंतर फायनल किंमत शेख यांनी सांगितली. त्यामुळे संबंधित व्यक्ती सोमवारी दुपारी पुण्यातून साताऱ्यात आली.

आरीफ शेख यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर बुलेटची ट्रायल घेतो, असे सांगून त्या व्यक्तीने बुलेटला कीक मारली. बुलेट ट्रायलसाठी घेऊन गेल्यानंतर अर्धा तास होऊन गेल्यानंतरही संबंधित व्यक्ती न आल्याने शेख यांनी शोधाशोध केली. बुलेट व संबंधित व्यक्ती गायब झाल्याने शेख यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकारची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधितावर बुलेट चोरीचा गुन्हा दाखल केला.

Web Title: One man fled with a bullet, saying he would take the trial in satara