कार-दुचाकीच्या धडकेत एकजण ठार, महिला जखमी; पुसेसावळी-कडेपूर मार्गावर झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 17:21 IST2023-04-11T17:20:23+5:302023-04-11T17:21:07+5:30
पुसेसावळी: दुचाकी व कारच्या धडकेत एकजण जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली. प्रकाश पांडुरंग वाघमोडे (वय ४५, ...

कार-दुचाकीच्या धडकेत एकजण ठार, महिला जखमी; पुसेसावळी-कडेपूर मार्गावर झाला अपघात
पुसेसावळी: दुचाकी व कारच्या धडकेत एकजण जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली. प्रकाश पांडुरंग वाघमोडे (वय ४५, रा.देवकरवाडी सातारा) असे मृताचे नाव आहे. तर प्रकाश यांची पत्नी छाया वाघमोडे (३८) या गंभीर जखमी झाल्या. खटाव तालुक्यातील पुसेसावळी-कडेपूर रस्त्यावरील गोरेगाव वांगी येथील (माने वस्ती) येथे हा अपघात झाला.
याबाबत माहिती अशी की, प्रकाश वाघमोडे पत्नीसह आपल्या दुचाकी क्रमांक (एम.एच ११ बी.एन.१६३७) वरून कुपवाड मिरज बाजुकडून कडेपुर मार्गे साताऱ्याकडे निघाले होते. गोरेगाव वांगी (मानेवस्ती) येथे आले असता समोरुन येणाऱ्या भरधाव कारने (एम.एच - १० सी.ए.०८०४) वाघमोडे यांच्या दुचाकीस धडक दिली. यात वाघमोडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली.
याप्रकरणी दादासो विष्णू घागरे यांनी औंध पोलिस स्टेशनला उशीरा तक्रार दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे अधिक तपास करीत आहेत.