शिरगावघाटात स्विफ्ट कार व ट्रकची धडक, एक ठार, सात जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 22:30 IST2019-12-19T22:30:18+5:302019-12-19T22:30:46+5:30
वाई तालुक्यातील शिरगाव घाटामध्ये स्विफ्ट कार व ट्रक यांच्यात धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये एकजण ठार तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत.

शिरगावघाटात स्विफ्ट कार व ट्रकची धडक, एक ठार, सात जखमी
पाचवड (वार्ताहर) : वाई तालुक्यातील शिरगाव घाटामध्ये स्विफ्ट कार व ट्रक यांच्यात धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये एकजण ठार तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की , बोअरवेल खोदण्याचे साहित्य घेऊन जाणार ट्रक क्रमांक टऌ11ट 3571 हा शिरगाव घाटातून वाठारकडे निघाला होता. त्याचवेळी स्विफ्ट कार क्रमांक टऌ12खे 4684 ही भरधाव वेगात वाठारमार्गे शिरगांवकडे निघाली होती. दरम्यान स्विफ्ट कारने हुलकावणी दिल्याने ट्रक व कारची जोरदार धडक झाली. यावेळी झालेल्या अपघातामध्ये बोअरवेलचे साहित्य वाहणारा ट्रक पलटी झाल्याने त्यामध्ये मागील बाजूस बसलेला एकजण जागीच ठार झाला व ट्रक ड्राइव्हरसह इतर कामगार जखमी झाले. दरम्यान धडकेनंतर स्विफ्टकार 40 फूट खोल दरीमध्ये कोसळली. यामध्ये स्विफ्ट कारमधील चारजण गंभीर जखमी आले आहेत.
ठार झालेल्या एकास शवविच्छेदनासाठी भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले असून सर्व जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.