साताऱ्याजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 17:45 IST2019-12-05T17:43:52+5:302019-12-05T17:45:02+5:30
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा हद्दीतील माईल स्टोन हॉटेलजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत अंदाजे ४५ वर्षीय पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास झाला.

साताऱ्याजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत एक ठार
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा हद्दीतील माईल स्टोन हॉटेलजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत अंदाजे ४५ वर्षीय पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास झाला.
याबाबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी रात्री महामार्गाच्याकडेने एक व्यक्ती चालत निघाली होती. त्यावेळी पुणे बाजूकडून आलेल्या अज्ञात वाहनाने त्या व्यक्तीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, संबंधित व्यक्ती जागीच ठार झाली.
या अपघाताची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची ओळख पटली नाही. ती व्यक्ती फिरस्ती असू शकते, असे पोलिसांनी सांगितले.