Satara News: भरधाव टेम्पोची दुचाकीस धडक, एकाचा जागीच मृत्यू; एक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 17:31 IST2023-02-27T17:30:22+5:302023-02-27T17:31:01+5:30
अपघातानंतर टेंम्पो चालकाने पलायन केले.

Satara News: भरधाव टेम्पोची दुचाकीस धडक, एकाचा जागीच मृत्यू; एक जण जखमी
संतोष खरात
लोणंद : लोणंद -सातारा रोडवर विश्रामगृहाजवळ एका अज्ञात टेम्पोने दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर, एक जण किरकोळ जखमी झाला. दतात्रय किसन जाधव (वय ५०) असे मृताचे नाव आहे. तर सतिश लक्ष्मण लकडे (४०, दोघेही रा. निंबुत छपरी ता. बारामती जि. पुणे) असे जखमीचे नाव आहे. ही घटना आज, सोमवारी (दि.२७) दुपारच्या दरम्यान घडली.
याबाबत माहिती अशी की, मृत दत्तात्रय जाधव व त्यांचा मित्र सतिश लकडे हे लोणंद-सातारा रोडवरुन निरा बाजूकडे निघाले होते. दरम्यान, लोणंद येथील विश्रामगृहाजवळ त्यांच्या दुचाकीला टेम्पोची जोराची धडक झाली. या धडकेत दत्तात्रय हे टेम्पोच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेले त्यांचे मित्र सतिश लकडे हे रस्त्याच्या बाजूला पडल्याने किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर टेंम्पो चालकाने पलायन केले.
लोणंद पोलिस अधिक करीत आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी पाठविण्यात आला असून पुढील तपास लोणंद पोलीस करीत आहेत.