Satara: काळज येथे टोळक्याकडून एकाची निर्घृण हत्या

By दीपक शिंदे | Updated: October 15, 2024 13:26 IST2024-10-15T13:26:14+5:302024-10-15T13:26:49+5:30

फलटण : काळज (ता. फलटण) येथे काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास  मोटरसायकल वरून आलेल्या टोळक्याने गावातील एकाची कोयता व धारदार शस्त्राने वार ...

One brutally killed by a mob at Kalaj Satara | Satara: काळज येथे टोळक्याकडून एकाची निर्घृण हत्या

Satara: काळज येथे टोळक्याकडून एकाची निर्घृण हत्या

फलटण : काळज (ता. फलटण) येथे काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास  मोटरसायकल वरून आलेल्या टोळक्याने गावातील एकाची कोयता व धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नितीन तकदीर मोहिते (वय ४०) असे मृताचे नाव आहे.   

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, काळज गावातील नितीन मोहिते  हे काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास समाज मंदिरात बसले होते. यावेळी त्या ठिकाणी मोटर सायकलवरून आलेला अज्ञात युवकांनी त्यांच्यावर कोयता व धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये नितीन मोहिते गंभीर जखमी झाले.  

त्यांना लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेने काळजसह परिसरात खळबळ उडाली. लोणंद पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: One brutally killed by a mob at Kalaj Satara