सातारा: जमीन वाटपावरून वाद, ऑपरेशनच्या ब्लेडने सख्ख्या भावावर केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 13:16 IST2022-07-19T13:16:38+5:302022-07-19T13:16:58+5:30

जमीन वाटून देत नसल्याचा मनात राग

One brother stabbed another brother with the blade of an operation due to a land allotment dispute in satara | सातारा: जमीन वाटपावरून वाद, ऑपरेशनच्या ब्लेडने सख्ख्या भावावर केले वार

सातारा: जमीन वाटपावरून वाद, ऑपरेशनच्या ब्लेडने सख्ख्या भावावर केले वार

सातारा : जमीन वाटपाच्या कारणावरून दोघा भावांमध्ये वाद झाल्यानंतर एका भावाने दुसऱ्या भावावर ऑपरेशनच्या ब्लेडने वार केले. यामध्ये संबंधित भाऊ जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील रेवंडी गावातील प्रवीण बबन भोसले (वय २९) हे सध्या कोंडवेतील दिव्यनगरीमध्ये वास्तव्यास आहेत. प्रवीण भोसले हे दि. १७ रोजी सकाळी पावणेआठ वाजता घरात झोपले होते. त्यावेळी त्यांचा भाऊ सचिन भोसले हा त्यांच्या घरात आला. आई-वडील रेवंडी येथील घर, जमीन वाटून देत नसल्याचा राग मनात धरून त्याने प्रवीण भोसले यांच्या दंडावर ऑपरेशनच्या ब्लेडने वार केले. यानंतर तो तेथून पसार झाला.

जखमी प्रवीण भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा जाबजबाब घेतला. त्यानंतर त्यांचा भाऊ सचिन भोसले याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयित सचिन भोसले हा एका खासगी दवाखान्यात काम करत असून, त्याने हे ऑपरेशनचे ब्लेड दवाखान्यातून आणले असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. याबाबत हवालदार आशिष कुमठेकर हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: One brother stabbed another brother with the blade of an operation due to a land allotment dispute in satara