शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तळ्यात नकोय ‘राजकीय प्रदूषण’!

By admin | Updated: June 25, 2014 00:30 IST

नागरिकांचा उद्वेग: विसर्जनप्रश्नी सहा महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार करूनही जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी

सातारा : मंगळवार तळ्यातलं पाणी अनायसे उपसलंच आहे. पाऊसही लांबला आहे. त्यामुळं मोठ्या मूर्ती आजमितीस विसर्जन करायच्या झाल्यास शक्यच नाही. तळ्याची हीच पाणीपातळी गणेशोत्सवापर्यंत कायम ठेवावी. तसेच ‘दुर्गंधीमुक्तीच्या मोहिमेत राजकीय प्रदूषण नको’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. विसर्जन आणि त्यामुळं होणाऱ्या प्रदूषणाबद्दल सहा महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार करूनही प्रशासनानं वेळीच हालचाली केल्या नाहीत, याचा संताप नागरिकांच्या बोलण्यातून जाणवतो. मोती तळ्यात विसर्जनबंदी केल्यानंतर मंगळवार तळ्यावर अतिरिक्त भार पडून प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. तळ्याची धारणक्षमताही विचारात न घेता विसर्जित केलेल्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचे भग्नावशेष उघड्या डोळ्यांनी पाहणं आणि नाक मुठीत धरून जगणं नागरिकांच्या वाट्याला आलंय. ‘लोकमत’ने हा विषय हाती घेताच परिसरातील नागरिकांनी मुक्तपणे मते मांडण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी एका इमारतीच्या ‘पार्किंग’मध्ये नागरिकांनी मनातली खदखद ‘लोकमत’ टीमसमोर मोकळी केली. असं एका सुरात लोक म्हणू लागलेत. वेगवेगळे जनसमूह एकत्रित येऊन याप्रश्नी मार्ग काढण्यास पुढं येऊ लागलेत. यावर्षी मासे मृत्युमुखी पडू लागल्यावर यांत्रिक मार्गानं पाणी उपसलं गेलं. या प्रक्रियेत परिसरात झालेल्या प्रदूषणामुळं नागरिक आजारी पडलेच; शिवाय घरातली तांब्या-पितळेची भांडी, चांदीचे अलंकार, इतकंच काय देवघरातले देवही काळे पडले. पावसामुळं हळूहळू पाणी वाढू लागलं असलं, तरी नागरिकांना तळं भरूच नये, असं मनापासून वाटतंय. मोठ्या गणेशमूर्ती आणि दुर्गामूर्तींच्या विसर्जनास सावत्रिक विरोध असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. गेल्या चार महिन्यात या प्रश्नाचे चटके जवळजवळ प्रत्येकाने सोसले असल्यामुळे प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी श्रमदानापासून काहीही करण्याची तयारी नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दाखविली. (लोकमत टीम)