शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

कºहाडच्या प्रवेशद्वारावर घुमतोय निर्मळेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 1:19 AM

कºहाड : कºहाड शहरात कोठेही कचºयाचा एक तुकडाही पडू नये संपूर्ण शहर स्वच्छ दिसावं म्हणून पालिकेतील प्रत्येक घटकांकडून प्रयत्न ...

ठळक मुद्दे पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता : ग्रीन स्पेस विकसासाठी धडपड

कºहाड : कºहाड शहरात कोठेही कचºयाचा एक तुकडाही पडू नये संपूर्ण शहर स्वच्छ दिसावं म्हणून पालिकेतील प्रत्येक घटकांकडून प्रयत्न केले जात आहेत. जिथं-तिथं दिसेल तिथं पडलेला कचरा उचलण्याची जणू सवयच पालिकेच्या सफाई कर्मचाºयांना लागली आहे. सध्या शहरातील ग्रीन स्पेसच्या जागांवर स्वच्छतेची मोहीम सुरू असून, शनिवारी कोल्हापूर नाक्यावरील हायवे पुलाखालील मोकळ्या जागेची कर्मचाºयांनी स्वच्छता केली.

कºहाड शहरात उघड्यावर ‘कचरा टाकेल तो दंड भरेल’ असे सांगत पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. कोणी उघड्यावर कचरा टाकताना अथवा घाण करताना दिसला की त्याला पकडून त्यांच्या हातात शंभर ते दीडशे रुपयांची पावती दिली जात आहे. तर दुसरीकडे शहराच्या सुशोभीकरणासाठी पालिकेने जोमाने सुरुवात केली आहे.

‘स्वच्छ कºहाड, सुंदर कºहाड’ बनविण्याच्या दृष्टीने कºहाड पालिकेच्या वतीने पाऊल टाकले असून, गत नवीन वर्षात पालिकेचे ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये यश हे उद्दिष्ट्य समोर ठेवले आहे. शहरातील प्रवेशद्वारावरील आयलँडला झळाळी प्राप्त करून देण्यासाठी पालिकेने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेची नुकत्यात झालेल्या विशेष सभेत कºहाड शहर स्वच्छ बनविण्याबरोबर पर्यटकांचे आकर्षण वाढावे म्हणून पालिकेकडून शहरातील नऊ ठिकाणे सुशोभीत करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत शनिवारी पालिकेतील सहा कर्मचाºयांकडून कोल्हापूर नाक्यावरील हायवे पुलाखालील मोकळी जागा, लगतचे नाले, आयलँड आदी ठिकाणी साचलेला कचरा एकत्रित केला. सुमारे तीन ते चार तास स्वच्छता मोहीम राबवित प्रवेशद्वार स्वच्छ केला.रोज करावा लागतो दुर्गंधीशी सामना...कºहाड पालिकेत सुमारे पाचशेहून अधिक कर्मचाºयांची संख्या आहे. यातील बहुतांश कर्मचाºयांपैकी स्वच्छता, पाणीपुरवठा या विभागातील कर्मचाºयांना जास्त काम असते. यातील स्वच्छता विभागातील कर्मचाºयांना तर दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागतो.पालिकेतील स्वच्छतेचे आम्ही शिलेदारकºहाड येथील प्रवेशद्वार असलेल्या यशवंतराव चव्हाण स्वागत कमान परिसरात पालिकेतील मारुती काटरे, लक्ष्मण थोरवडे, आकाश वायदंडे, मोहन वायदंडे, नाना सोनावले, संदीप भोसले या सहा कर्मचाºयांकडून स्वच्छता करण्याचे काम नुकतेच करण्यात आले. या शिलेदारांकडून करण्यात आलेल्या स्वच्छतेमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.कºहाड येथील कोल्हापूर नाक्यावरील यशवंतराव चव्हाण स्वागत कमानीलगतच्या हायवेच्या पुलाखालील मोकळ्या जागेची शनिवारी पालिका कर्मचाºयांनी स्वच्छता केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान