भाच्यानेच केले मामाच्या मुलीशी अश्लील कृत्य, साताऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 16:56 IST2022-05-02T16:55:38+5:302022-05-02T16:56:24+5:30

तू माझ्यासोबत लग्न नाही केलेस तर तुला व तुझ्या आई-वडिलांना जीवे मारीन, अशी धमकी दिली.

Nephew did obscene act with uncle daughter in Satara | भाच्यानेच केले मामाच्या मुलीशी अश्लील कृत्य, साताऱ्यातील धक्कादायक घटना

भाच्यानेच केले मामाच्या मुलीशी अश्लील कृत्य, साताऱ्यातील धक्कादायक घटना

सातारा : मामाच्या तेरा वर्षीय मुलीला फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचे समोर आल्यानंतर मामाने भाच्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर संबंधित भाच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित १३ वर्षांची मुलगी साताऱ्यातील एका शाळेत शिकत आहे. १ मे रोजी मामाच्या २५ वर्षीय मुलाने तिला दुचाकीवर बसवून एका फ्लॅटमध्ये नेले. तेथे त्याने तिच्याशी अश्लील कृत्य केले. तू माझ्यासोबत लग्न नाही केलेस तर तुला व तुझ्या आई-वडिलांना जीवे मारीन, अशी धमकी दिली.

या प्रकारानंतर संबंधित पीडित मुलीने घरी गेल्यानंतर मामाच्या मुलाने केलेले कृत्य वडिलांना सांगितले. त्यानंतर मामाने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन २४ वर्षीय भाच्याच्या विरोधात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Nephew did obscene act with uncle daughter in Satara