शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
3
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
4
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
5
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
6
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
7
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
8
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
9
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
10
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
11
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
12
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
13
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
14
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
15
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
16
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
17
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
18
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
19
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
20
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

व्यूहरचनेत राष्ट्रवादीचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2015 00:21 IST

खंडाळा तालुका : काँग्रेसने शब्द पाळला; मात्र मतदान विरोधात !

दशरथ ननावरे - खंडाळा -जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीच्या दत्तानाना ढमाळ यांनी बाजी मारून बँकेतील सेकंड इनिंगला प्रारंभ केला. आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने शिस्तबद्ध व्यूहरचना केल्याने विरोधी गोटातीलही मते मिळूवन मोठा विजय संपादित केला. काँग्रेसने जिल्हा बँकेला उमेदवार देणार नसल्याचा शब्द पाळला खरा मात्र मतदान राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात करून तालुक्यात आमचा विरोध कायम असल्याचे पुन्हा एकादा या निवडणुकीतून समोर आले आहे.जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षांतर्गतच मोठी रस्सीखेच होती. पक्षाने अधिकृत उमेदवारी विद्यमान संचालक दत्तानाना ढमाळ यांना जाहीर केल्याने बँकेचे माजी अध्यक्ष बकाजीराव पाटील यांनी बंडाचा झेंडा उभारला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील , जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके, शामराव गाढवे हे प्रबळ दावेदार नाराज झाले होते. त्यातच आनंदराव शेळके यांचा अर्ज कायम राहिल्याने त्यांची भूमिका गुलदस्त्यात होती.वास्तविक, खंडाळा सोासायटी मतदारसंघात राष्ट्रवादीकडे ५१ पैकी ३६ सोसायट्यांसह प्राबल्य होते. मात्र, बकाजीराव पाटील यांच्या बंडाळीने आणि नितीन भरगुडे-पाटील यांच्या नाराजीने राष्ट्रवादीतच गट निर्माण झाले. मात्र पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याचा चंग आमदार मकरंद पाटील यांनी बांधला. तालुक्यातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून पक्षाची भूमिका मांडली तसेच नाराजांची नाराजी दूर करण्यातही यश मिळविले. मात्र अखेरपर्यंत काँग्रेस आणि नितीन भरगुडे-पाटील यांची भूमिका स्पष्ट झाली नसल्याने खंडाळ्यातील चुरस कायम होती.खंडाळा साखर कारखान्याची निवडणूक राष्ट्रवादीने माघार घेतल्याने बिनविरोध झाली होती. त्यामुळे जिल्हा बँकेला काँग्रेसचा उमेदवार न देण्याचा शब्द ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे यांनी पाळला; पण, राष्ट्रवादीतच बंडाळी उफाळून आल्याने लढत गुरू-शिष्यामध्येच रंगली.४ भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून निवडणूक लढविणारे अजय धायगुडे-पाटील यांना ५४५ मतांपर्यंतच मजल मारता आली. तर इतर मागास प्रवर्गातून राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार राजेंद्र नेवसे यांना ३९ मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे दोघांनाही राखीव मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. वास्तविक, राजेंद्र नेवसे यांनी प्रचारात कुठेही आघाडी घेतल्याचे दिसले नाही.