भाजपचं माझ्यावर आजही प्रेम; १०० कोटी घेतले असते तर बरं झालं असतं, पण... : शशिकांत शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 01:07 PM2021-10-20T13:07:11+5:302021-10-20T13:07:21+5:30

आपण ED आणि Income Tax विभागालाही घाबरत नाही, शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य.

NCP leader shashikant shinde slams bjp over various issues 100 crore praises sharad pawar ajit pawar | भाजपचं माझ्यावर आजही प्रेम; १०० कोटी घेतले असते तर बरं झालं असतं, पण... : शशिकांत शिंदे

भाजपचं माझ्यावर आजही प्रेम; १०० कोटी घेतले असते तर बरं झालं असतं, पण... : शशिकांत शिंदे

Next
ठळक मुद्देआपण ED आणि Income Tax विभागालाही घाबरत नाही, शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य.

"मी परिणामांचा विचार करत नाही. आपण ईडी आणि इन्कम टॅक्सलाही घाबरत नाही. माझ्यावर भाजपचं खुप प्रेम होतं. आजही ते माझ्यावर खुप प्रेम करतात. मला वाटतं त्यावेळी मी १०० कोटी घेतले असते तर बरं झालं असतं. पण त्यांना कल्पना आहे की मी शरद पवार यांचा निष्ठावंत पाईक आहे आणि मेलो तरी त्यांना सोडणार नाही," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केलं. साताऱ्यातील कट्टापूरमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

"भाजपला, ईडी आणि बाकी सीडीला पळवून लावमारे कोणी कार्यकर्ते असतील तर ते आमच्यासाखे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. आपण परिणामांचा विचार करत नाही. आपण ईडीच्या बापाला आणि इन्कम टॅक्स विभागाच्या बापालाही घाबरत नाही," असं म्हणत त्यांनी निशाणा साधला.

किरीट सोमय्यांवर टीका
बोलताना शशिकांत शिंदे यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला. "मध्यंतरी किरीट सोमय्या या ठिकाणी आले होते. मी अजित पवार यांना सांगितलं होतं मला परवानगी द्या. त्यांचा तोतरेपणा एकदा बाहेर काढतो का नाही हे पाहा. परंतु अजित पवार यांनी मला नको म्हणून सांगितलं," असंही ते यावेळी म्हणाले.

Web Title: NCP leader shashikant shinde slams bjp over various issues 100 crore praises sharad pawar ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app