Satara: ढेबेवाडीनजीक दगडाने ठेचून युवकाचा खून, मारेकरी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 11:49 IST2023-12-19T11:45:32+5:302023-12-19T11:49:32+5:30
ढेबेवाडी : ढेबेवाडीपासून जवळच असलेल्या वांग नदी शेजारी काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास एका व्यावसायिकाचा दगडाने ठेचून खून झाला. ऋतुराज ...

Satara: ढेबेवाडीनजीक दगडाने ठेचून युवकाचा खून, मारेकरी फरार
ढेबेवाडी : ढेबेवाडीपासून जवळच असलेल्या वांग नदी शेजारी काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास एका व्यावसायिकाचा दगडाने ठेचून खून झाला. ऋतुराज दिलीप देशमुख (वय ३१, रा. कुसुर ता. कराड) असे मृताचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून ढेबेवाडी पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच त्याचा वाटेतच मृत्यू झाला. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे पथक दाखल झाले होते.