Satara: कराडात कार्वे नाक्यावर भरदिवसा तरुणाचा खून, हल्लेखोर पसार

By प्रमोद सुकरे | Updated: December 2, 2023 16:46 IST2023-12-02T16:45:31+5:302023-12-02T16:46:53+5:30

खुनाचे कारण समजू शकले नाही

Murder of a youth in broad daylight at Karve Naka in Karad satara | Satara: कराडात कार्वे नाक्यावर भरदिवसा तरुणाचा खून, हल्लेखोर पसार

Satara: कराडात कार्वे नाक्यावर भरदिवसा तरुणाचा खून, हल्लेखोर पसार

कराड : कराड येथील कार्वेनाका परिसरात शनिवारी भरदिवसा युवकावर एकाचा चाकूने वार करून खून झाला असून हल्लेखोर फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. खुनाचे कारण समजू शकले नाही. शुभम रविंद्र चव्हाण असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील कार्वे नाका येथे शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास शुभम चव्हाण याच्यावर अज्ञाताने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. हल्लेखोर संशयित घटनास्थळावरून पसार झाला आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी शुभमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, गुन्हेप्रकटीकरण शाखेचे पोलीस उपरिक्षक राजू डांगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. आरोपीचा शोध सुरु आहे.

Web Title: Murder of a youth in broad daylight at Karve Naka in Karad satara