शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

माझं लग्न का करत नाही म्हणून डोक्यात कुऱ्हाड घालून आईचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 12:22 IST

‘माझं लग्न का करत नाहीस, मला काम का सांगतेस,’ असे म्हणत जन्मदात्या आईचा डोक्यात कुºहाडीने घाव घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना  गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास खटाव तालुक्यातील मोराळे येथे घडली.

ठळक मुद्देडोक्यात कुऱ्हाड घालून आईचा खूनखटाव तालुक्यातील मोराळे येथील घटना

 

सातारा : ‘माझं लग्न का करत नाहीस, मला काम का सांगतेस,’ असे म्हणत जन्मदात्या आईचा डोक्यात कुºहाडीने घाव घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना  गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास खटाव तालुक्यातील मोराळे येथे घडली.कांताबाई शहाजी शिंदे (वय २९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किरण शहाजी शिंदे (वय २९) याचे लग्न ठरत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. ‘माझं लग्न कर,’ असे म्हणून तो आईच्या मागे तगादा लावत होता.दरम्यान, वडील शहाजी शिंदे हे  गुरुवारी रात्री लघुशंकेसाठी झोपेतून उठले होते. घरात बाथरुम नसल्यामुळे ते घराबाहेर जात होते. याचवेळी मुलगा किरण शिंदे याने वडिलांच्या पाठीत लाथ मारून त्यांना घराबाहेर ढकलेले. त्यानंतर आतून कडी लावून घेतली. झोपेत असलेल्या आईला उठवून त्याने ‘तू माझं लग्न का करत नाहीस व मला नेहमी काम का सांगतेस,’ असे म्हणत  वाद घालण्यास सुरूवात केली.

संतापाच्या भरात मागचा पुढचा विचार न करता किरणने आईच्या डोक्यात कुºहाडीने घाव घेतले. यात आईचा जागीच मृत्यू झाला. मुलगा आतून दरवाजाची कडी उघडत नसल्याने वडिलांनी शेजाºयांना उठवले. त्यानंतर दरवाजा तोडून नागरिकांनी घरात प्रवेश केला.

पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीसही तत्काळ घटनास्थळी पोहोचले.  कुºहाडीसह किरणला पोलिसांनी ताब्यात घेतले. जन्मदात्या आईचाच मुलाने खून केल्याने खटाव तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. मुलावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसर