अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार, लोणंद एमआयडीसीनजीक अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 13:35 IST2022-05-13T13:34:56+5:302022-05-13T13:35:16+5:30

धडक देऊन ही भरधाव अज्ञात कार शिरवळकडे निघून गेली.

Motorcyclist killed on the spot in accident near Lonand MIDC | अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार, लोणंद एमआयडीसीनजीक अपघात

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार, लोणंद एमआयडीसीनजीक अपघात

लोणंद : लोणंद एमआयडीसी रोडवर गोळेगाव फाट्यानजीक भरधाव वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. यशवंत कोकीळ असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. आज, शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, लोणंद-शिरवळ रस्त्यावर गोळेगाव फाट्याजवळ वाघोशी येथे राहणारे यशवंत भिकू कोकीळ हे वाघोशीहून लोणंदकडे मोटार सायकाल (एमएच ११ बीएम ३२१५) लुनावरून येत होते. गोळेगाव फाट्याजवळ आले असता लोणंदहून शिरवळकडे निघालेल्या भरधाव कारने त्याच्या मोटार सायकलला समोरून जोरदार धडक दिली.

धडक देऊन ही भरधाव अज्ञात कार शिरवळकडे निघून गेली. जोरदार धडकेत यशवंत कोकीळ (वय ८०, रा. वाघोशी) हे जागीच ठार झाले. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. लोणंद पोलीस वाहनाचा शोध घेत आहेत.

Web Title: Motorcyclist killed on the spot in accident near Lonand MIDC