शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

बहुलेत ग्रामस्थांनी बांधले तब्बल ४१ बंधारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST

मल्हारपेठ : चार वर्षांपूर्वी पाणलोट क्षेत्र विकासासाठी बहुले (ता. पाटण) गावात ४१ बंधारे बांधून पाणी अडविल्याने आजमितीला शिवारात सर्व ...

मल्हारपेठ : चार वर्षांपूर्वी पाणलोट क्षेत्र विकासासाठी बहुले (ता. पाटण) गावात ४१ बंधारे बांधून पाणी अडविल्याने आजमितीला शिवारात सर्व विहिरी तुडुंब भरल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

पाणलोट क्षेत्राच्या विकासासाठी बहुले येथील शेतकरी राजू पाटील यांच्या धाडसी निर्णयामुळे शिवारातील ओढ्याचे पाणी वाया न घालवता बंधारे अडवून पाणीसाठा केला. बहुले गावच्या शिवारासह शेजारील गावांनाही याचा लाभ झाल्याने चौथ्या वर्षी बारमाही पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांतन समाधान व्यक्त होत आहे. बहुले गावातील शेतकरी राजू पाटील हे आपल्या नऊ एकर शेतीला बारमाही पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, ऐन उन्हाळ्यात त्यांना टंचाईस सामोरे जावे लागत होते. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी शेतकरी भरत पानस्कर, अंकुश पानस्कर, राजन पवार, शंकर पवार, दाजी पवार, पांडुरंग डवरी, मानसिंग पानस्कर, भिमराव जरे, भरत पवार यांना एकत्र करून शिवारात वाया जाणारे पाणी ठिकठिकाणी बंधारे बांधून अडविले. पाण्याचा साठा केला. ग्रामस्थांसमवेत लोकसहभागातून मातीचे ४१ बंधारे बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम त्यांनी आखली. त्याद्वारे बहुले शिवारात ऐतिहासिक चळवळ उभी राहिली. ही चळवळ सध्या चार वर्षे पूर्ण करीत आहे.

शिवारातील पन्नास एकर शेती विहिरींच्या पाण्यावर अवलंबून असल्याने येथे विहिरींची संख्या जास्त आहे. अलीकडील काळात विहिरींची पाणी पातळी खाली जात असून पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी टंचाई भासू लागली होती. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत होती. बंधारे बांधल्यामुळे बंधाऱ्यात पाणी साचून उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेचे महत्त्व ग्रामस्थांना पटले असल्याने त्यांनी आपला सहभाग नोंदविला. त्यामळे सुमारे तीनशे एकर शेती क्षेत्र ओलिताखाली आली आहे.

- चौकट

इतर गावांनाही झाला लाभ

बहुले गावात बंधारे बांधण्यात आल्याने त्याचा लाभ विभागातील अन्य गावांनाही झाला आहे. शिवारातील गारवडे, पाळेकरवाडी येथील विहिरींना उन्हाळ्यातही पावसाळ्याप्रमाणे पाणी आहे. सध्या बहुले परिसरात बंधाऱ्यात पाणी अडविल्याने सर्व विहिरी तुडुंब भरल्या आहेत. हे पाहण्यासाठी अन्य गावांतील शेतकरी व शासकीय अधिकारी भेटी देत आहेत. राजू पाटील यांनी इतर गावांसाठी आदर्श समोर ठेवला आहे.

फोटो : २२केआरडी०३

कॅप्शन : बहुले, ता. पाटण गावात ऐन उन्हाळ्यात बंधारे भरलेले आहेत. त्यामुळे परिसरातील विहिरींमध्येही मुबलक पाणीसाठा आहे. (छाया : सुनील साळुंखे)