शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या जागी आईचं नाव!

By admin | Updated: September 17, 2014 22:28 IST

मतदार हतबल : निवडणूक याद्यांमधला घोळात घोळ संपेना

सागर गुजर - सातारा -विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार केलेल्या मतदारयाद्यांमध्ये वडिलांच्या नावाच्या रकान्यात चक्क आईचे नाव लिहिण्यात आलेय. यासह अनेक चुकांची जंत्रीच विद्यमान मतदारयाद्यांमध्ये असल्याने या चुकांच्या दुरुस्तीत गुंतलेल्या ‘बीएलओं’ची भलतीच तारांबळ उडताना पाहायला मिळत आहे.लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारांना केवळ यादीत नाव नाही म्हणून मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागले होते. मधल्या काळात काही सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तीही फोल ठरली आहे. सध्या तयार असणाऱ्या मतदारयाद्या प्रत्येक ‘बीएलओं’कडे देण्यात आल्या आहेत. या याद्यांमध्ये असणाऱ्या चुकांची दुरुस्ती करताना हे कर्मचारी अक्षरश: वैतागून गेले आहेत. अनेक याद्यांमध्ये मतदारांचे फोटो नाहीत. अनेक ठिकाणी मतदाराचा फोटो आणि केवळ नाव आहे, पत्त्याचा पत्ताच नाही.कवी नारायण सुर्वे यांनी मार्मिक टिप्पणी केली आहे. पोराच्या बापाचं नाव विचारल्यानंतर ‘लिव्हा मास्तर तुमचंच नाव!,’ असं सांगणाऱ्या हताश मातेची गूढ संमती मास्तरांचे डोके चक्रावणारी होती. तीच अवस्था सध्या निवडणुकीच्या कामावर असणाऱ्या ‘बीएलओ’ अधिकाऱ्यांची झाली आहे. मतदारयादीत मतदाराचे नाव व त्याच्या वडिलांच्या नावाचा उल्लेख असतो. वडिलांच्या नावावर चक्क आईचे नाव आहे. फोटो चुकीचे आहेत. पुरुष मतदार असेल, तर लिंगाच्या रकान्यात ‘स्त्री’ असा उल्लेख आहे. तर स्त्री मतदार असेल, तर लिंगाचा उल्लेख ‘पुरुष’ असा करण्यात आला आहे.मतदारयादीत नाव समाविष्ट करताना फॉर्म क्र. ६ सविस्तर भरून घेतला जातो. या फॉर्मसोबत पत्त्यासाठी रेशनकार्ड, वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला सोबत घेतला जातो. ही कागदपत्रे दिली असतानाही निवडणूक विभागातील कर्मचारी मतदार याद्यांमध्ये चुका करतात. सध्या ‘बीएलओं’ना मतदारांच्या घराचे उंबरे झिजवावे लागत आहेत. एकंदरीत, लोकसभा निवडणुकीच्या अनुभवातून काहीच न शिकल्याने तेच घोळ यादीत ठाण मांडून आहेत. (प्रतिनिधी)पत्ताच झाला बेपत्तामतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांच्या पत्त्याचाच उल्लेखच नाही. सदर बझारमधील एखाद्याचे नाव असेल तर घर क्रमांक, घर कुठे आहे ते ठिकाण दाखविणारी जागा याचा उल्लेखच नाही. आता मतदार स्लिप द्यायची झाल्यास ती कशी द्यायची हा प्रश्न आहे. त्यातच नवीन मतदारांची नोंद करून दिल्यास त्यांची नावेही या मतदारयाद्यांमध्ये घेतली जात नाहीत, असे एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.