मोहोडेकरवाडी ग्रामस्थांनी वणवा विझविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:42 IST2021-03-09T04:42:18+5:302021-03-09T04:42:18+5:30

वेळे : मोहोडेकरवाडी (ता. वाई) येथे डोंगराला लागलेला वणवा येथील सजग नागरिकांनी विझविला. रविवारी संध्याकाळी येथील डोंगर रांगांना वणवा ...

Mohodekarwadi villagers extinguished the fire | मोहोडेकरवाडी ग्रामस्थांनी वणवा विझविला

मोहोडेकरवाडी ग्रामस्थांनी वणवा विझविला

वेळे : मोहोडेकरवाडी (ता. वाई) येथे डोंगराला लागलेला वणवा येथील सजग नागरिकांनी विझविला. रविवारी संध्याकाळी येथील डोंगर रांगांना वणवा लागला होता. सुरुवातीला याचे स्वरूप तीव्र नसल्याने हा वणवा कोणाच्याही ध्यानात आला नाही. नंतर त्याने रौद्ररूप धारण केल्यावर येथील ग्रामस्थांना वणवा भयंकर असल्याचे निदर्शनास आले.

याची खबर येथील ग्रामस्थांनी वन विभागाला दिली.

त्यानंतर सोमवारी दुपारी भुईंजचे वनपाल संग्राम मोरे, वनरक्षक संजय आडे, लक्ष्मण देशमुख, वनमजूर अमोल इथापे यांच्यासह मोहोडेकरवाडीचे ग्रामस्थ संदीप जगताप, अजित बांदल, विकास बांदल आदी ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत हा वणवा विझविला. या वणव्यात हरित संपदा, वनसंपदा पूर्णपणे जळून नष्ट झाली, तसेच या डोंगररांगेत असणाऱ्या पवनचक्क्यांचे नुकसान होता-होता वाचले. हा वणवा नक्की कशामुळे लागला की कोणी जाणून बुजून लावला, याबाबत वनविभाग तपास करीत आहे.

Web Title: Mohodekarwadi villagers extinguished the fire