धकटवाडी सरपंचपदी मोहन जाधव, तर उपसरपंचपदी मोनाली माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:15 AM2021-08-02T04:15:03+5:302021-08-02T04:15:03+5:30

खटाव : धकटवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडी जाहीर झाल्या. या निवडीमध्ये सरपंचपदी मोहन बंडू जाधव, तर ...

Mohan Jadhav as Dhakatwadi Sarpanch and Monali Mane as Deputy Sarpanch | धकटवाडी सरपंचपदी मोहन जाधव, तर उपसरपंचपदी मोनाली माने

धकटवाडी सरपंचपदी मोहन जाधव, तर उपसरपंचपदी मोनाली माने

googlenewsNext

खटाव : धकटवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडी जाहीर झाल्या. या निवडीमध्ये सरपंचपदी मोहन बंडू जाधव, तर उपसरपंचपदी मोनाली हिंदुराव माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पार्टी समझोत्यानुसार मावळते सरपंच कृष्णा रंगू माने व उपसरपंच मोहन बंडू जाधव यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर सरपंच, उपसरपंच निवड जाहीर झाली. सरपंचपदासाठी मोहन बंडू जाधव यांना सूचक म्हणून शारदा मारुती जाधव; तर उपसरपंचपदासाठी मोनाली हिंदूराव माने यांना संतोष अर्जुन जाधव यांनी सूचक म्हणून नाव सुचविले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी. आर. कुलकर्णी यांनी काम पाहिले. यावेळी सदस्या सुनंदा रामचंद्र जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण माने, ग्रामसेवक एच. बी. पखाले, रामदास निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी लक्ष्मण जाधव, अर्जुन जाधव, किसन माने, जनार्दन जाधव, व्यंकटराव माने, शिवाजी निंबाळकर, नंदकुमार जाधव, शरद जाधव, पोपट जाधव, अजय जाधव, भगवान जाधव, दत्तात्रय माने, विजय महाडिक, किसन जाधव, अरुण माने, संतोष माने, सचिन माने, भीमराव जाधव, लक्ष्मण काटकर, आदींसह ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच यांचे कौतुक केले.

Web Title: Mohan Jadhav as Dhakatwadi Sarpanch and Monali Mane as Deputy Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.