आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:40 IST2021-03-31T04:40:24+5:302021-03-31T04:40:24+5:30

सातारा : सातारा आणि जावली तालुक्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात ...

MLA Shivendra Singh Raje's birthday celebrated with great enthusiasm | आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

सातारा : सातारा आणि जावली तालुक्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या ‘लोकमत’च्या विशेष पुरवणीचे प्रकाशन शिवेंद्रसिंहराजेंच्या कन्या रुणालीराजे आणि चिरंजीव रुद्रनीलराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, नगरसेवक अमोल मोहिते, माजी नगरसेवक जयेंद्र चव्हाण, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, नगराध्यक्ष अशोक मोने, नगरसेवक अविनाश कदम, उद्योजक फिरोज पठाण आदी उपस्थित होते.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भेटीस येऊ नये, असे आवाहन केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या गावातच आणि संस्थांमध्ये त्यांचा वाढदिवस उपस्थितीचे बंधन पाळून साजरा केला. सातारा शहर आणि तालुक्यातही गावांमधील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वाढदिवस साजरा केला. मतदारसंघात सर्वच ठिकाणी प्लेक्स लावण्यात आले होते. त्यामुळे सातारा आणि जावली हे दोन्ही तालुके शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अभिष्टचिंतन आणि शुभेच्छांच्या फ्लेक्सनी गजबजून गेले. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, शेती उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका आणि शहर, तसेच तालुक्यात वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Web Title: MLA Shivendra Singh Raje's birthday celebrated with great enthusiasm