Satara Crime: अल्पवयीन मुलीसोबत साखरपुडा, भेटण्यासाठी वारंवार घरी जाऊ लागला, अन्..

By दत्ता यादव | Updated: March 1, 2023 14:13 IST2023-03-01T14:00:20+5:302023-03-01T14:13:05+5:30

पीडित मुलीच्या आईने या प्रकारानंतर भुईंज पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली

Minor girl raped after engagement, Incident in wai Taluka of Satara | Satara Crime: अल्पवयीन मुलीसोबत साखरपुडा, भेटण्यासाठी वारंवार घरी जाऊ लागला, अन्..

संग्रहीत छाया

सातारा : सोळा वर्षांच्या मुलीशी साखरपुडा झाल्यानंतर वारंवार तिच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार वाई तालुक्यातील एका गावात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भुईंज पोलिसांनी कर्नाटकातील गुलबर्गामधील एकावर बालात्काराचा गुन्हा दाखल केला. 

माेनेश अंबय्या भंडारे (वय २५, रा. आझापरू, ता. आळंद जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोनेश भंडारे याचा वाई तालुक्यातील एका गावातील १६ वर्षांच्या मुलीसोबत साखरपुडा झाला होता. त्यानंतर तो तिला भेटण्यासाठी वारंवार तिच्या घरी जाऊ लागला. त्यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला. 

यातून पीडित मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिली. हा प्रकार मोनेशला समजल्यानंतर त्याने गर्भपात होण्याच्या उद्देशाने गोळ्या आणून तिला दिल्या. त्यानंतर मुलीचा गर्भपात झाला. पीडित मुलीच्या आईने या प्रकारानंतर भुईंज पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक आर. एस.भंडारे हे अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: Minor girl raped after engagement, Incident in wai Taluka of Satara