Satara: मंत्री जयकुमार गोरे यांचे माण-खटावमध्ये ‘ऑपरेशन लोटस’; राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:57 IST2025-10-29T13:57:12+5:302025-10-29T13:57:40+5:30
शरद पवार गटालाही खिंडार...

Satara: मंत्री जयकुमार गोरे यांचे माण-खटावमध्ये ‘ऑपरेशन लोटस’; राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार
सातारा : माण-खटाव विधानसभा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी ‘ऑपरेशन लोटस’ची तीव्रता वाढवली आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत यांच्यासह राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे यांनी दिली.
माण-खटावच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री झाल्यापासून अनेकांचा भाजप पक्षप्रवेश सुरू आहे. आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधातील हेविवेट पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये घेण्याचे ऑपरेशन सुरू आहे. राष्ट्रवादीचे खटाव तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे अनेक दिवसांपासून मंत्री गोरे यांच्या संपर्कात होते. आता त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.
मोरे यांच्यासह माजी उपसभापती बाळासाहेब माने-हिवरवाडीकर, माजी उपसभापती हिराचंद पवार, शंकरराव मोरे (दातेवाडी), मुरली भुशारी, बबन कदम, सुरेश पाटील, जयवंत घाडगे, राकेश चवर, अतुल यलमर, महेंद्र देशमुख, बापूराव घाडगे आणि इतर पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे अरुण गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शरद पवार गटालाही खिंडार...
माण तालुक्यातीलही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत हे कमळ हाती घेत आहेत. त्यांच्याबरोबर सूरज गुंडगे, नगरसेवक महेश जाधव, राजेंद्र साळुंखे, राजेंद्र रामचंद्र साळुंखे, दत्तात्रय अवघडे, वर्षाराणी सावंत, सोसायटी अध्यक्षा वैशाली सावंत, संचालक संजय जाधव, दत्तात्रय जाधव, प्रकाश जाधव, दीपक म्हेत्रे, राजेंद्र जाधव, प्रसाद जाधव, लालासाहेब अवघडे, साईनाथ जाधव, लक्ष्मण खताळ, राजेंद्र महाडिक हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती गोरे यांनी दिली.
भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या विश्वासाने ग्रामविकास विभागाचे महत्त्वाचे मंत्रिपद माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिले आहे. मंत्रिपदाच्या माध्यमातून मतदारसंघात विकासकामे करण्याला प्राधान्य देत आहोत. या विकास प्रवाहात विरोधातील अनेकजणांची सहभागी होण्याची इच्छा आहे. आणखी विरोधी पक्षातील नेते भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत. - जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री