शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पोटाची खळगी भरण्यासाठी माणवासीयांचे स्थलांतर

By admin | Updated: November 23, 2015 00:24 IST

जगण्यासाठी धडपड : मेंढपाळ व्यावसायिक, ऊसतोड मजूर, रंगकाम करणारे गाव सोडू लागले

कुकुडवाड : नुकतीच दिवाळी संपली अन् माण तालुक्यातील स्थलांतराने वेग घेतला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी माण तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणात धंदा अथवा व्यवसायानिमित्त तालुक्याबाहेर भिन्न ठिकाणी स्थलांतरित होताना दिसत आहे. मेंढपाळ, ऊसतोड कामगार, रंगकाम करणारे गाव सोडू लागले आहेत.माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. माणवासीय जनतेसाठी दुष्काळ हा पाचवीला पुजलेला. तालुक्याचे सरासरी पाऊसमान ४५० मिलीमीटर; मात्र यंदा फक्त ३५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे झालेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरले नाही. पर्यायाने जमिनीतील पाणीही पातळी वाढली नाही. अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण केवळ २५० मिलीमीटर इतकेच आहे.माण तालुक्यातील खरिपाची पिके पावसाअभावी वाया गेली, तर उशिरा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे रब्बीची पिके हाती लागण्याची शक्यता कमी आहे. कांदा पिकामुळे काही शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले; मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणी घालावे लागले. दुसऱ्या बाजूला दराच्या पडझडीमुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा पिकाने अक्षरश: रडविले. अशा विचित्र अवस्थेत दिवाळीचा सण बहुतांशी माणवासीय जनतेने ओढून-ताणून साजरा केला.दिवाळी झाली अन् माणवासीय जनता आपापल्या सोयीने पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतराच्या तयारीत आहेत. काहीजण स्थलांतराच्या मार्गावर, तर अनेकजण व्यवसाय अथवा धंद्याच्या ठिकाणी पोहोचलेही आहेत. ऊसतोडणी, मेंढपाळ, व्यवसाय व मुंबई, वसई येथेल मातीकाम, रंगकाम हे येथील जनतेचे हक्काचे.पोटापाण्याचे व्यवसाय मेंढपाळ, शेळ्या-मेंढ्यांसह लातूर, बार्शी तसेच मराठवाड्यातील अनेक गावी जातात. जून महिन्यात पाऊस झाल्यानंतरही जनता परत आपल्या गावी येते. या कालावधीत मेंढपाळ करणाऱ्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागते. प्रसंगी नुकसान ही सोसावे लागते. आपले पशुधन वाचविण्यासाठी येथील जनता गाव व आपले शिवार सोडून परप्रांतात जातात, ही वस्तुस्थिती आहे.ऊसतोडणीसाठी तर माण तालुक्यातील अनेक लोक कुटुंबासह सहा महिने बागायत क्षेत्रात स्थलांतरित होतात. म्हातारी माणसं घर राखण्यासाठी लहान मुलासह गावी राहतात. तर काही लहान मुले, शाळेला दांडी मारून आईबाबासोबत ऊसतोडीला जातात. वळई, बिदळी, पर्यंती, ढाकणी, जांभुळवाडी, कुरणेवाडी, वरकुटे, पानवन, दिवड, पळशी, धामणीसह अनेक गावांतील जनता ऊसतोडणीसाठी वारणा, सह्याद्री, वाळवा तसेच सांगली भागात स्थलांतरित होतात.म्हसवड परिसरातील वीरकरवाडी व इतर वाड्या-वस्त्यांवरील लोक मातीकामानिमित्त वसई (मुंबई) याठिकाणी जातात. तर हिंगणी, हावलदारवाडी, कारखेल, खडकी, संभूखेड परिसरातील अनेक लोक रंगकामानिमित्त मोठ्या प्रमाणात मुंबई येथे काही प्रमाणात बेंगलोर, हैद्राबाद येथे जातात. (वार्ताहर)पाणीप्रश्न सोडविण्याची गरजपोटासाठीव प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी माणदेशी जनता नोव्हेंबर ते मे महिन्याअखेर इतर प्रांतात स्थलांतरित होतात. या स्थलांतरामुळे प्रामुख्याने मुलांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होत आहे. माण तालुक्याच्या स्थलांतराला थोपविण्यासाठी येथील जनतेला आपल्या गावात उद्योग व्यवसाय मिळविण्यासाठी माण तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविणे हा एकमेव उपाय आहे. भविष्यात त्यादृष्टीने उपाययोजना होणे ही काळाची गरज आहे.