शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

सदस्य म्हणतात सभा झेडपीतच घ्या !,शासन पत्र व्हीसीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:14 PM

coronavirusunlock, zp, sataranews कोरोनामुळे शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सभा व्हीसीद्वारे सुरू आहेत. मात्र, प्रश्नांची सोडवणूक होत नाही व विषय अर्धवट राहत असल्याने सर्वसाधारण सभातरी झेडपीतच घेण्यासाठी सदस्य आता आक्रमक झाले आहेत. बाजार सुरू झाले, शाळांची घंटा वाजली, मंदिरे उघडली. मग, कमी संख्या असणारी सभाच झेडपीत का नको असा सवालही सदस्य करु लागले आहेत.

ठळक मुद्देसदस्य म्हणतात सभा झेडपीतच घ्या !,शासन पत्र व्हीसीचे बाजार, शाळा सुरू, मग सभाच का नकोचा सवाल

सातारा : कोरोनामुळे शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सभा व्हीसीद्वारे सुरू आहेत. मात्र, प्रश्नांची सोडवणूक होत नाही व विषय अर्धवट राहत असल्याने सर्वसाधारण सभातरी झेडपीतच घेण्यासाठी सदस्य आता आक्रमक झाले आहेत. बाजार सुरू झाले, शाळांची घंटा वाजली, मंदिरे उघडली. मग, कमी संख्या असणारी सभाच झेडपीत का नको असा सवालही सदस्य करु लागले आहेत.याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. गावे, शहरांबरोबरच खेडोपाडीही बाधित सापडू लागले आहेत. तसेच शासकीय कार्यालयातही कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अशीच स्थिती राज्यभरात आहे. त्यामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या सर्वच सभा या व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्याचा निर्णय घेतला. तसा पत्रव्यवहार सर्वच जिल्हा परिषदांना करण्यात आला होता. यामुळे शासनाचे हे बंधन सर्वांवरच आले. परिणामी जिल्हा परिषदेच्या सर्वच सभा, बैठका या व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे होत आहेत.सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांची मासिक सभा, स्थायी समिती सभा या ह्यव्हीसीह्णद्वारेच होत आहेत. तसेच आतापर्यंत झालेल्या दोन सर्वसाधारण सभा याही व्हीसीद्वारेच घेण्यात आल्या. त्यातच आता पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सर्वसाधारण सभेचा घाट घालण्यात आला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही सभा होऊ शकते. त्यामुळे बहुतांशी सदस्यांनी सर्वसाधारण सभा सभागृहातच घ्या, म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.सर्वसाधारण सभा ह्यव्हीसीह्णद्वारे घेताना टेक्निकल अडचणी निर्माण होतात. तसेच विषयांत सुसूत्रता राहत नाही. सभापटलावर येणारा विषय पूर्ण न होता, अर्धवट राहतो. प्रत्येकजण आपापले विषय पुढे आणत असतो. यामुळे प्रश्नांची आणि विषयांची सोडवणूक होत नाही. त्यामुळे विकासकामांवर परिणाम झाल्याचे सदस्यांतून सांगण्यात येत आहे. एकंदरीतच व्हीसीद्वारे सर्वसाधारण सभा घेण्यास बहुतांशी सदस्यांचा विरोध आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत होणारी सर्वसाधारण सभा प्रशासन कोणत्या पध्दतीने घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.बाजारात शेकडोजण, सभेला ९०...जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला ६४ सदस्य, संबंधित तालुक्यांचे पंचायत समिती सभापती आणि काही अधिकारी उपस्थित असतात. साधारणपणे ९० ते १०० पर्यंत उपस्थितांची संख्या राहते. त्यामुळे गर्दीचा विषय फारसा येत नाही. त्यातच सोशल डिस्टन्स ठेवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाऐवजी यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात सर्वसाधारण सभा घ्या. त्यामुळे गर्दी होण्याचा विषयच होत नाही, असा सूर सदस्यांनी लावला आहे. तर दुसरीकडे बाजार सुरू करुन गर्दी होते, शेकडोजण येतात, झेडपीची ९० जणांत होणारी सभाच का समोरासमोर नको, असे सदस्य म्हणू लागले आहेत.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा व्हीसीद्वारे न घेता सभागृहात घेण्याची मागणी जवळपास सर्वच सदस्यांची आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. प्रशासनानेही शासनाला पत्रव्यवहार केला आहे. लवकरच निर्णय अपेक्षित आहे.- उदय कबुले, अध्यक्ष जिल्हा परिषद

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसरCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक