युवतीसह आईस लग्नासाठी मारहाण

By Admin | Updated: July 24, 2014 22:09 IST2014-07-24T21:59:27+5:302014-07-24T22:09:59+5:30

निरगुडी येथील सात जणांविरोधात गुन्हा

Married to mother marrying maiden | युवतीसह आईस लग्नासाठी मारहाण

युवतीसह आईस लग्नासाठी मारहाण

फलटण : लग्न करत नसल्याच्या कारणावरून रागाच्या भरात निरगुडी, ता. फलटण येथील १९ वर्षीय युवतीसह तिच्या आईला हाताने, दगडाने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सात जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आज (गुरुवार) सकाळी अकराच्या सुमारास गावातील सुरेश नानासाहेब मदने ऊर्फ बबन्या यांच्याबरोबर लग्न का करत नाही, असा जाब विचारत सुरेश मदने, सीता नानासाहेब मदने, अमित अनिल मदने, किरण पोपट जाधव, प्रमोद तुकाराम जाधव (सर्व रा. निरगुडी, ता. फलटण) यांनी युवती व तिच्या आई-वडिलांना हाताने, दगडाने मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. या घटनेची फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Married to mother marrying maiden