शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात विवाहितेचा जाचहाट; पतीसह चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

सातारा : येथील एका विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती, सासू, नणंद हिच्यासह चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला ...

सातारा : येथील एका विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती, सासू, नणंद हिच्यासह चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण मुळीक, सुनंदा मुळीक, कल्याण येवले, राजेंद्र येवले अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अश्विनी लक्ष्मण मुळीक (वय २७, रा. मंगळवार पेठ, सातारा. सध्या रा. कामाठीपुरा पेठ, काळोखे चौक, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पती लक्ष्मण भीमराव मुळीक हे आणि सासू सुनंदा भीमराव मुळीक या दोघांनी ऑक्टोबर २०१३ पासून ते आजअखेर माहेरून दीड लाख रुपये आणि एक तोळ्याची अंगठी घेऊन ये म्हणून छळ केला. तसेच हाताने मारहाण, शिवीगाळ करण्याबरोबरच दमदाटी केली. अश्विनी यांची नणंद कल्याणी येवले आणि तिचा पती राजेंद्र येवले या दोघांनी त्यांच्या घरातील कामे करण्यास सांगितली. यास नकार दिला म्हणून या दोघांनी अश्विनी यांना शिवीगाळ करत दमदाटी केली.

याप्रकरणी अश्विनी यांनी मंगळवार, दि. १८ रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.