शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

चित्रपटातील कामाचं स्वप्न भंगल्यानं बनला मनोरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 7:53 PM

दत्ता यादव । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : चित्रपटात काम करण्यासाठी अनेक तरुण प्रयत्न करत असतात. मात्र, यात सगळ्यांनाच ...

दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : चित्रपटात काम करण्यासाठी अनेक तरुण प्रयत्न करत असतात. मात्र, यात सगळ्यांनाच यश येईल, हे निश्चित नसलं तरीसुद्धा अनेक युवक चित्रपटात काम करण्यासाठी संपूर्ण आयुष्यच झोकून देतात. मात्र, यात यश मिळाले नाही तर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे आपण पाहत असतो. असाच काहीसा प्रकार सातारा तालुक्यातील एका गावात घडला असून, एका युवकाचं चित्रपटात काम करण्याचं स्वप्न भंगल्यानं तो मनोरुग्ण झाल्याचं समोर आलं.सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३५ वर्षीय अजयला (बदललेले नाव) शालेय जीवनापासूनच चित्रपटाचं प्रचंड आर्कषण होतं. अ‍ॅक्टिंग हे त्याच्या रक्तातच होतं. गावच्या पारावर नकला तर कधी अभिनय तो करत होता. निळू फुले यांचा तो जबरी फॅन होता. त्यांच्यासारख्या अभिनयाचा ध्यास त्याने घेतला होता. चित्रपटात काम करून आपण एक दिवस मोठे स्टार होणार, यासाठी तो प्रचंड मेहनत घेत होता. अनेक चित्रपटाच्या त्याने आॅडीशन्सही दिल्या. मात्र, अपयश जणू हात जोडून त्याच्या समोर उभं असायचं. त्यामुळे तो सतत तणावाखाली राहायचा. वडिलांच्या व्यसनाचेही टेन्शन असल्यामुळे त्याने चक्क घरातून बाहेर पडणं सोडून दिलं. वडील व्यसनी होते. मात्र, मोलमजुरी करून किमान मुलांना जगवत होते. अशातच एक दिवस वडिलांचा अपघात झाला. वडील कायमचे सोडून गेले. त्याचा धक्का त्याच्या आईला आणि दुसºया लहान भावालाही बसला. अगदी हलाखीची परिस्थिती झाली. अजयचे हळूहळू मानसिक संतुलन ढासळले. तो मनोरुग्ण म्हणूनच गावात वावरू लागला. चित्रपटात काम करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेला अजय स्वत:च्या विश्वात रमून गेला. त्याची ही परिस्थिती पाहून गावकऱ्यांची मनेही हेलावून गेली. गावकºयांनी सामाजिक कार्यकर्ते रवी बोडके यांना याची माहिती दिली. त्यानंतर रवी बोडके यांनी गावात जाऊन अजयवर उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्याला रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. त्याला या आजारातून बरे करून त्याचे आयुष्य त्याला परत मिळावे, यासाठी रवी बोडके यांनी चंग बांधला आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या अजयविषयी सर्व गावकºयांना सहानुभूती आहे. तो यातून लवकर बरा व्हावा, यासाठी गावकºयांचेही प्रयत्न सुरू आहेत.कुटुंबातील तिघांवर एकाचवेळी उपचार सुरूअजय आणि त्याच्या आई, भावाचे मानसिक संतूलन बिघडल्याने गावकरी चिंताग्रस्त झाले. अजयसह त्याच्या कुटुंबावर योग्य उपचार व्हावेत, यासाठी गावकºयांनी पुढाकार घेतला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अजयवर उपचारासाठी प्रयत्न करण्याची मागणी गावकºयांनी केली. अखेर पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते रवी बोडके यांना बोलावून घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला. त्यांनीही अजयवर तत्काळ उपचार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.