Satara: बीअरबारमध्ये बिल देण्याच्या वादातून व्यवस्थापकावर हल्ला, सीसीटीव्ही डीव्हीआरसह ७० हजार रुपये लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:14 IST2025-11-08T16:14:10+5:302025-11-08T16:14:24+5:30
उंब्रज पोलिसांनी तीन जणांना अटक केली

Satara: बीअरबारमध्ये बिल देण्याच्या वादातून व्यवस्थापकावर हल्ला, सीसीटीव्ही डीव्हीआरसह ७० हजार रुपये लंपास
उंब्रज (जि. सातारा) : उंब्रज हद्दीतील हॉटेल वंदन बीअर बार ॲण्ड लॉजिंग येथे बिल देण्याच्या वादातून व्यवस्थापकावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर सीसीटीव्ही डीव्हीआरसह सत्तर हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. प्रथमेश पाटील, अजय यादव, विराज देसाई, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
रोहित सयाजी भोसले यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहित भोसले हे हॉटेल वंदन बीअर बारचे मॅनेजर आहेत. गुरुवार, दि. ६ रात्री साडेआठच्या सुमारास संशयित आरोपी प्रथमेश पाटील, अजय यादव, विराज देसाई, दत्ता कोळेकर व इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्ती हॉटेलमध्ये आले. दारू पिल्यानंतर बिल देण्याच्या कारणावरून त्यांचा वाद झाला.
त्यातून त्यांनी फिर्यादी रोहित भोसले यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हॉटेलमधील गल्ल्यातील ७० हजार रुपये रक्कम जबरदस्तीने घेतली. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीची वायर तोडून डीव्हीआर मशीन काढून घेतली, तसेच रिव्हॉल्व्हरसारखी वस्तू दाखवत हॉटेलमधील दारूच्या बाटल्या, टेबल, खुर्च्या फोडून नुकसान केले.