शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरच्या कचरा डेपोला आग, हवेत धुराचे लोट; नागरिकांना श्वसनाचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 17:22 IST

कचऱ्याला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे नगरपालिकेने याची गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

मलकापूर : आगाशिवनगर येथील सांडपाणी प्रक्रिया योजनेजवळच्या कचरा डेपोला आग लागल्याने हवेत धुराचे लोट पसरले होते. या धुराने शास्त्रीनगरसह लाहोटीनगर परिसराचा श्वास गुदमरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचऱ्याला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे नगरपालिकेने याची गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.मलकापूर पालिकेकडून शहरातील सुका व ओला कचरा वेगवेगळा गोळा करून त्यावर प्रक्रिया करत आधुनिक पध्दतीने खतनिर्मिती केली जाते. पालिकेचे खतनिर्मितीसाठी महामार्गाच्या पूर्व व पश्चिम बाजूला असे दोन प्रकल्प आहेत. त्यापैकी एक प्रकल्प महामार्गाच्या पश्चिम बाजूला सांडपाणी प्रक्रिया योजनेलगतच आहे. खतनिर्मिती प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या कचऱ्याशिवाय राहिलेला व टाकाऊ कचरा सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या बाजूलाच टाकला जातो. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग साचला आहे. या साचलेल्या कचऱ्याला शुक्रवारी रात्री अचानकपणे आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट आकाशात पसरले.दरम्यान, पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे वारे वाहू लागल्याने या कचरा डेपोतून निघणारे धुराचे लोट शास्त्रीनगर, लाहोटीनगरसह महामार्गाच्या बाजूला पसरले. रात्रीची वेळ असल्यामुळे नेमका धूर कुणीकडून येतोय हे लक्षात आले नाही. शनिवारी सकाळी पाहिले असता पालिकेच्या कचरा डेपोला आग लागून त्यातून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. या धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग