शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

Satara: मल्याळम दरोडेखोरांचा शोध, दुभाषक बनला पोलिस!, कार चालकाला अडवून लांबविली होती २० लाखांची रोकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:23 IST

टीप देणाऱ्याचा शोध सुरु 

सातारा: भुईंज येथील दरोड्यातील एक दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागला. परंतु तो कन्नड अन् मल्याळम बोलू लागला. तो काय म्हणतोय हे पोलिसांना समजेना. अखेर या दोन्ही भाषा येणारा दुभाषक पोलिसांनी शोधला. त्याला सोबत घेऊन दरोडेखोरांचा शोध सुरू झाला. काही तासांसाठी दुभाषक ऑनरेकाॅर्ड पोलिसच बनला. त्याच्या मदतीने केरळमध्ये जाऊन सातारा पोलिसांनी एक-दोन नव्हे तर सहा दरोडेखोरांना अटक केली. या दुभाषकाशी पोलिसांची चांगलीच गट्टी जमली.भुईंज येथील महामार्गावर १२ जुलैच्या रात्री सात-आठ दरोडेखोरांनी कार चालकाला अडवून २० लाखांची रोकड लांबविली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. एका आरोपीला सांगली पोलिसांनी पकडल्यानंतर सातारा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची भाषा पोलिसांसाठी अडसर ठरू लागली. काही तास दुभाषक शोधण्यात गेले. पण जो दुभाषक पोलिसांच्या साथीला मिळाला. तो कन्नड अन् मल्याळम बोलण्यात एक्सपर्ट होता. मुख्य दरोडेखोर विनीथ याला घेऊन सातारा पोलिसांची टीम केरळमध्ये गेली. दुभाषक जे सांगणार होता. त्यावरच पोलिसांचा तपास अवलंबून होता. त्यामुळे त्या दुभाषकाची रितसर नोंद करून वरिष्ठांची परवानगी घेण्यात आली. केरळ पोलिसांना सोबत घेण्यात आले. परंतु तेथील पोलिसांवर फारसा भरवसा न ठेवता सोबत असलेल्या दुभाषकावरच आपल्या सातारा पोलिसांचा भरवसा अधिक होता. मुख्य दरोडेखोराने सांगितलेल्या माहितीच्या आधारे केरळमधील वायनाड येथून एक-एक करत तब्बल सहा दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. एकेका दरोडेखोराची चाैकशी झाली. या चाैकशीत ही टोळी आंतरराज्य टोळी असल्याचं स्पष्ट झालं. अत्यंत खतरनाक अशी ही मल्याळम अन् कन्नड दरोडेखोरांची टोळी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात साताऱ्यात आणली.

मल्याळम दरोडेखोरांना टीप देणारा महाराष्ट्रीयनचसांगलीतील एका व्यावसायिकाची मुंबई आणि विटा येथे ज्वेलर्सची दुकाने आहेत. या दुकानाची २० लाखांची रोकड मुंबईला नेली जात होती. याची टीप या मल्याळम दरोडेखोरांना महाराष्ट्रीयन व्यक्तीनेच दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. हा टीप देणारा कोण, हे आता पोलिस शोधत आहेत.

‘त्यांनी’ पेट्रोलसाठी २४ हजार वापरले!तब्बल २० लाखांची रोकड चोरून नेल्यानंतर दरोडेखोरांनी त्यातील २४ हजार रुपये पेट्रोलसाठी खर्च केले. उर्वरित रक्कम त्यांनी सुरक्षित ठेवली होती. त्यामुळे एवढी मोठी रक्कम सुरक्षितपणे पोलिसांना हस्तगत करता आली.

यामुळे पोलिसांचा ताणही हलकाया दुभाषकाशी पोलिसांची चांगलीच गट्टी जमली होती. तो दोन्ही भाषा समजावून सांगताना काही अवघड शब्द ऐकून पोलिसांना हसू आवरता यायचे नाही. यामुळे पोलिसांचा ताणही हलका होत होता. केवळ शब्दातूनच नव्हे तर हावभावातूनही ही भाषा वेगळी असल्याचे पोलिस सांगताहेत.