Maharashtra Rain Updates : पाटण तालुक्यात दरड कोसळल्याने घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली, 3 कुटुंबातील लोक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 10:57 AM2021-07-23T10:57:38+5:302021-07-23T11:13:36+5:30

Maharashtra Rain Live Updates : मुसळधार पावसामुळे मदत कार्यामध्ये अडचणी येत आहेत या भागातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

Maharashtra Rain Live Updates: 3 families go missing in Patan taluka | Maharashtra Rain Updates : पाटण तालुक्यात दरड कोसळल्याने घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली, 3 कुटुंबातील लोक बेपत्ता

Maharashtra Rain Updates : पाटण तालुक्यात दरड कोसळल्याने घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली, 3 कुटुंबातील लोक बेपत्ता

Next

कोयनानगर - पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असणाऱ्या आंबेघर येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे.  गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आहे. 

मुसळधार पावसामुळे मदत कार्यामध्ये अडचणी येत आहेत या भागातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे तर किल्ले मोरगिरी येथेही दरड कोसळल्याने महादेवाचे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे येथील परिसरातील ग्रामस्थांना प्रशासनाने इतरत्र हलवले आहे ही घटना ही गुरुवारी सायंकाळी घडली आहे.

Read in English

Web Title: Maharashtra Rain Live Updates: 3 families go missing in Patan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app