शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर-प्रतापगड घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:40 IST

महाबळेश्वर : प्रतापगड गेल्या दीड महिन्यांपासून अंबेनळी घाटातील वाहतूक गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कंबर कसली असून, घाटातील ...

महाबळेश्वर : प्रतापगड गेल्या दीड महिन्यांपासून अंबेनळी घाटातील वाहतूक गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कंबर कसली असून, घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी आता काँक्रिट टाकण्याचे काम सुरू असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या चार दिवसांत महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील वाहतूक पूवर्वत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंबेनळी घाटातील रस्ता तुटून दरीत कोसळला होता, तर अनेक ठिकाणी मोठमोठ्या दरडी कोसळल्या होत्या. अशाप्रकारे एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर घाटातील रस्त्याचे नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ होती. २१ जुलैपासून हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. गेली दीड महिना ही वाहतूक बंद आहे. ही वाहतूक सुरू करण्यासाठी सावर्जनिक बांधकाम विभागाने घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मुसळधार पावसात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे काम सुरू करून केवळ दीड महिन्यात रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होत आहे. त्यामुळे आता पुढील चार दिवसांत या मार्गावरील वाहतूक सुरू होण्यास मदत होणार आहे.

या मार्गावरील वाहतूक सुरू होताच, किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेली २२ गावेही आता महाबळेश्वर तालुक्याशी पुन्हा जोडली जाणार आहेत. अंबेनळी घाटातून वाहतूक सुरू होताच, किल्ले प्रतापगडावरील पर्यटन सुरू होणार आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांची उपासमार आता थांबणार आहे. शेकडो स्थानिकांचा आता रोजगार सुरू होण्यास मदत होणार आहे.

(चौकट)

चाकरमान्यांमध्ये आनंद

सातारा जिल्ह्यातील अनेक चाकरमानी यांना उत्सवासाठी कोकणात जाता येणार आहे. अनेक लोक रस्ता नसल्याने गावी अडकून पडले होते. अशा सर्वांना आता बाहेर पडता येणार आहे. वाई येथून अंबेनळी घाटमार्गे कोकणात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला जातो. ती वाहतूक गेली दीड महिना बंद पडली होती. आता ही वाहतूक पूर्ववत होण्यास मदत होणार आहे. अशाप्रकारे सातारा जिल्ह्याचे लक्ष या अंबेनळी घाटातील रस्त्याकडे लागून राहिली आहे.