लोधवडे, मार्डीसह १४ ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST2021-01-08T06:08:19+5:302021-01-08T06:08:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क दहिवडी : माण तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली. त्यातील १४ गावे बिनविरोध झाली असून, ४७ गावांत ...

Lodhwade, Mardi and 14 Gram Panchayats without opposition | लोधवडे, मार्डीसह १४ ग्रामपंचायती बिनविरोध

लोधवडे, मार्डीसह १४ ग्रामपंचायती बिनविरोध

लोकमत न्यूज नेटवर्क

दहिवडी : माण तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली. त्यातील १४ गावे बिनविरोध झाली असून, ४७ गावांत अपवाद वगळता दुरंगी लढत होणार आहे. काही गावांतही अनेक प्रभाग बिनविरोध झाले आहेत.

बिनविरोध ग्रामपंचायतींमध्ये माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे लोधवडे, दिवंगत सदाशिव पोळ यांचे मार्डी, पाणी फाउंडेशनमध्ये चमकलेले भाटकी, रंगकामगार नेते धनाजी सावंत यांच्या हवलदारवाडीसह ऑल्मिपिक खेळाडू ललिता बाबर, पैलवान किरण भगतच्या मोही गावचा समावेश आहे.

बिनविरोधमध्ये गंगोती, इंजबाव, पुकळेवाडी, तोंडले, मोही, भाटकी, थदाळे, हवालदारवाडी, वाकी, टाकेवाडी, लोधवडे, स्वरूपखानवाडी, मार्डी, जाशी या गावांचा समावेश आहे. उरलेल्या ४७ गावांना रात्री उशिरापर्यंत चिन्ह वाटप सुरू होते. ६१ गावांत ५२९ सदस्य निवडून द्यायचे असून, यापैकी १४ गावांचे सर्व सदस्य व काही प्रभागांतील सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. काही ठिकाणच्या सदस्यांना वेळेअभावी माघार घेता आली नाही.

Web Title: Lodhwade, Mardi and 14 Gram Panchayats without opposition