शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडच्या ‘आयटीआय’मध्ये पडला उजेड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:39 IST

कोपर्डे हवेली : सैदापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची वीज जोडणी पंधरा दिवसांपूर्वी वीजबिल थकीत असल्याने तोडण्यात आली होती. ...

कोपर्डे हवेली : सैदापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची वीज जोडणी पंधरा दिवसांपूर्वी वीजबिल थकीत असल्याने तोडण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास व भाजप युवा मोर्चाने याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत केवळ सहा तासात वीज जोडणी पूर्ववत जोडण्यात आल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वीज तोडण्यात आल्याने कौशल्य विकास यांत्रिकरण विभाग बंद होता. परिणामी, विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. काही विद्यार्थी याठिकाणी निवास करतात. त्यांना विजेअभावी अंधारात चाचपडावे लागत होते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाड्याचा आणि डासांचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. येथील अंधाराचा फायदा घेऊन चोरीसारखे प्रकारही घडत होते. त्यामुळे तातडीने वीज जोडणी पूर्ववत द्यावी, न जोडल्यास संस्थेसमोर आंदोलन करु, असा इशारा भाजप युवा मोर्चाने दिला होता. जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी याबाबतचे निवेदन प्रभारी प्राचार्य एस. आय. भोसले यांना दिले होते. यावेळी पैलवान अक्षय चव्हाण, किशोर साळवे, श्रीकांत झेंडे, प्रशांत कदम आदी उपस्थित होते.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सचिव निवास जाधव यांनी गृहराज्यमंत्री व कौशल्य विकासमंत्री शंभुराज देसाई तसेच अल्पसंख्याक व कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. अखेर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करुन वीज जोडणी पूर्ववत केली.