शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

मुलाचा खून करणाऱ्या पित्याला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 1:17 PM

Court Satara : पती-पत्नीच्या कौटुंबिक कलहातून संतप्त झालेल्या पित्याने दारुच्या नशेत आठ वर्षाच्या मुलाला विष पाजून चिमुकल्याचा खून केल्याप्रकरणी जिल्हा प्रमुख न्यायाधीश आर.डी. सावंत यांनी पित्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, ही शिक्षा व्हिडीओ कान्फरन्सिंगवर सुनावण्यात आली.

ठळक मुद्देमुलाचा खून करणाऱ्या पित्याला जन्मठेप जिल्हा न्यायालयाचा निकाल; कौटुंबिक कलहातून घडली होती घटना

सातारा: पती-पत्नीच्या कौटुंबिक कलहातून संतप्त झालेल्या पित्याने दारुच्या नशेत आठ वर्षाच्या मुलाला विष पाजून चिमुकल्याचा खून केल्याप्रकरणी जिल्हा प्रमुख न्यायाधीश आर.डी. सावंत यांनी पित्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, ही शिक्षा व्हिडीओ कान्फरन्सिंगवर सुनावण्यात आली. शिवराज संतोष भिंगारे (वय ८ वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून संतोष लक्ष्मण भिंगारे (वय ३५, सध्या रा.पाचवड ता.वाई मूळ रा.कडेगाव जि.सांगली) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या पित्याचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी, संतोष भिंगारे व वैशाली भिंगारे यांना दोन मुले. दोघा पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होता. यातूनच पत्नी दोन्ही मुलांसह माहेरी कडेगाव येथे राहत होती तर पती पाचवड येथे राहत होता. शिवराज हा कडेगाव येथील शाळेत जात होता. दि. ४ मार्च २०१७ रोजी आरोपी संतोष भिंगारे याने कडेगाव येथील शिवराजच्या शाळेत जावून त्याने जबरदस्तीने पळून नेले. यावेळी शाळेतील शिक्षकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्याने शिवराजला घेऊन पलायन केले.संतोष याने मुलगा शिवराज याला भुईंज येथे आणले. तोपर्यंत शिक्षकांनी वैशाली भिंगारे यांना या घटनेची माहिती दिली. पतीने तुमच्या मुलाचा नेले आहे. पत्नी वैशाली यांनी या घटनेची माहिती कडेगाव पोलिसांना दिली. पित्याने मुलाला भुईंजमध्ये आणल्यानंतर त्याने मुलगा शिवराज याला विष पाजले व त्याने स्वत: पिवून फोन करुन तशी माहिती पत्नीला दिली. दरम्यान, दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . मात्र शिवराज याची प्रकृती चिंताजनक असतानाच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.मुलाच्या मृत्यूनंतर भुईंज पोलिस ठाण्यात वैशाली भिंगारे यांनी खूनाची तक्रार दिली. भुईंज पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला. संतोष भिंगारेची प्रकृती चांगली झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने संतोष भिंगारे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. नितीन मुके यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयSatara areaसातारा परिसर