शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाक्षीने दोन्ही राष्ट्रवादीचा संगम, कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:12 IST

एकत्रीकरणाच्या चर्चेत आशावादी चित्र..

प्रमोद सुकरेकराड (जि.सातारा) : राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी सकाळी कराडला पोहोचल्या. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराडला येत त्यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. यावेळी त्या खूपच भावुक दिसल्या; पण या निमित्ताने जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी येथे एकत्रित दिसले. कराडच्या प्रीतिसंगमावर दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा झालेला ‘संगम’ असाच कायम राहावा,’ अशा भावना उपस्थित कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत होत्या.सोमवारी सकाळी सुनेत्रा पवार कराडला पोहोचल्या. शासकीय विश्रामगृहात थोडावेळ थांबून त्या कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला पोहोचल्या. भावुक होत त्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तेथून वेणूताई चव्हाण सभागृहात आल्या. तेथे त्यांनी वेणूताई चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि बारामतीला रवाना झाल्या. पण, यादरम्यान प्रीतिसंगमावर सातारा जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ‘संगम’ झालेला पाहायला मिळाला.

वाचा: विलीनीकरण कोणाचे अन् कोणत्या पक्षात होणार?, सुनील तटकरेंनी व्यक्त केलं स्पष्ट मतसिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार व राष्ट्रवादी (शरद पवार)चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी (अजित पवार)चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, सुनील माने, अॅड. उदयसिंह पाटील, राजेश पाटील आदी मंडळी येथे एकत्रित आली. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.एकत्रीकरणाच्या चर्चेत आशावादी चित्र..एका बाजूला राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळी मते व्यक्त करताना दिसत आहेत. अशा वेळी कराडच्या प्रीतिसंगमावर यशवंतरावांच्या स्मृतिस्थळी सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्रित आल्याची घटना आशावादी मानायला हरकत नाही.

काळजी घ्या!सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील व पवार कुटुंबीयांचा स्नेह सर्वश्रुत आहे. आज प्रीतिसंगमावर सुनेत्रा पवार येणार हे कळताच स्वतः श्रीनिवास पाटील, चिरंजीव सारंग पाटील, स्नुषा रचना पाटील हे तिघेही तिथे आवर्जून उपस्थित होते. सुनेत्रा पवार स्मृतिस्थळावर आल्यानंतर त्यांनी श्रीनिवास पाटील यांच्याकडे पाहत हात जोडले. तेव्हा पाटील यांनी त्यांना ‘काळजी घ्या’ या शब्दात धीर दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar visits YB Chavan memorial, uniting NCP factions.

Web Summary : Sunetra Pawar's Karad visit saw rival NCP leaders unite at YB Chavan's memorial. This event sparks optimism amid ongoing unification talks, with leaders expressing gratitude and support.
टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारSatara areaसातारा परिसरKaradकराडNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार