शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

बोंबाबोंब.. ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया, साताऱ्यात पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्हला गळती

By सचिन काकडे | Updated: May 9, 2024 17:43 IST

सातारा : साताऱ्यातील गुरुवार पेठेत असलेल्या गुरुवार टाकीच्या व्हॉल्व्हला गुरुवारी सकाळी गळती लागली. पाणीपुरवठ्याच्या वेळेतच हा प्रकार घडल्याने हजारो ...

सातारा : साताऱ्यातील गुरुवार पेठेत असलेल्या गुरुवार टाकीच्या व्हॉल्व्हला गुरुवारी सकाळी गळती लागली. पाणीपुरवठ्याच्या वेळेतच हा प्रकार घडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. पालिकेकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असले तरी ऐन उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. साडेपाच लाख लिटर साठवण क्षमता असलेल्या गुरुवार  टाकीतून पहाटे पाच ते सकाळी सहा व सकाळी सहा ते सात अशा दोन सत्रात पाणीपुरवठा केला जातो. गुरुवारी पहिल्या सत्रात पालिका कार्यालय ते गुरुवार टाकी या भागाला पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अचानक टाकीजवळ असलेल्या व्हॉल्व्हची प्लेट निसटली अन् व्हॉल्व्हला मोठी गळती लागली. या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. टाकीजवळ असलेल्या गुरुवार बागेत पाण्याचा अक्षरशः पाट वाहत होता. घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. दरम्यान, दुसऱ्या सत्रात गुरुवार टाकी, वाघाची नळी, जीवनज्योत रुग्णालय, शकुनी गणेश मंदिर, कमानी हौद पिछाडी या भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पालिकेकडून येथील रहिवाशांना तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम पूर्ण करून नागरिकांना शुक्रवारी पूर्ण दाबाने व नियमित पाणीपुरवठा केला जाईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी